Join us

पाकिस्तानची दु:ख संपेनात! आधी ऑस्ट्रेलियाने बेक्कार हरवलं, त्यात बसला मोठा दणका

ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ३६० धावांनी उडवला धुव्वा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 21:28 IST

Open in App

PAK vs AUS 1st Test: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानी संघाचा ३६० धावांनी मोठा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने ४८७ आणि ५ बाद २३३ अशी दोन डावांत फलंदाजी केली. पाकिस्तानचा पहिला डाव २७१ तर दुसरा डाव अवघ्या ८९ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून बेक्कार पराभव झाल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. तशातच आता पाकिस्तानला आणखी एक मोठ्ठा दणका बसला आहे.

पहिल्या कसोटीत स्लो ओव्हर रेट राखल्याबद्दल पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दंड ठोठावण्यात आला आहे. पाहुण्या संघाला मॅच फीच्या 10% दंड ठोठावण्यात आला आणि त्यांच्या एकूण आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट्समधून दोन गुण वजा करण्यात आले. पाकिस्तान जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर घसरला होता आणि या पेनल्टीमुळे त्यांचे टक्केवारी गुण 66.67 वरून कमी होऊन 61.11 वर घसरले.

काय आहे आयसीसीचा नियम?

ICC आचारसंहितेचा कलम 2.22 षटकांच्या गतीशी संबंधित आहे. यानुसार खेळाडूंना त्यांच्या संघाने दिलेल्या वेळेत गोलंदाजी करता न आल्याने प्रत्येक षटकासाठी त्यांच्या मॅच फीच्या पाच टक्के दंड आकारला जातो. या व्यतिरिक्त, ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळण्याच्या अटींच्या कलम 16.11.2 नुसार, संघाला उशीर झालेल्या प्रत्येक षटकासाठी एक डिमेरिट पॉइंट दिला जातो, म्हणजेच तितके गुण वजा होतात. परिणामी, पाकिस्तानच्या एकूण गुणांमधून दोन जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुण वजा करण्यात आले आहेत.

टॅग्स :पाकिस्तानआॅस्ट्रेलियाआयसीसी