Join us

पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?

जर पाकिस्तानच्या संघ या सामन्यासाठी मैदानात उतरला नाही तर UAE च्या संघाला याचा फायदा मिळेल अन् 'अ' गटातून टीम इंडियासोबत ते सुपर फोरसाठी पात्र ठरतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 18:45 IST

Open in App

PAK vs UAE Asia Cup 2025 Pakistan Team May set to boycott Asia Cup 2025 : आशिया चषक स्पर्धेतील दहाव्या सामन्यात पाकिस्तान आणि यूएई हे दोन संघ समोरासमोर येणार आहेत. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यासंदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे. सुपर फोरमधील पात्रता सिद्ध करण्यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या लढतीवर पाकिस्तानचा संघ बहिष्कार टाकण्याचे संकेत मिळत आहेत. इथं जाणून घेऊयात नेमकं या सामन्याआधी काय घडतंय? त्यासंदर्भातील माहिती

सामान बसमध्ये अन् खेळाडू हॉटेलात

 दुबईच्या मैदानात रंगणाऱ्या सामन्यासाठी पाक  संघातील खेळाडूंचे साहित्य टीम बसमध्ये ठेवल्यानंतरही खेळाडूंनी हॉटेल सोडलेले नाही. त्यामुळेच पाकिस्तानचा संघ हा सामना खेळण्यासाठी तयार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.  जर पाकिस्तानच्या संघ या सामन्यासाठी मैदानात उतरला नाही तर UAE च्या संघाला याचा फायदा मिळेल अन् 'अ' गटातून टीम इंडियासोबत ते सुपर फोरसाठी पात्र ठरतील.

हस्तांदोलन प्रकरण तापलं, हा वाद ICC पर्यंत पोहचला, पण...

आशिया कप स्पर्धेतील 'अ' गटातून भारतीय संघाने सुपर फोरमध्ये प्रवेश निश्चित केलाय. तर ओमानचा संघ स्पर्धेबाहेर झालाय. या गटातील साखळी फेरीतील सामना पाकिस्तान आणि यूएई या दोन संघात रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीनंतर हस्तांदोलन न केल्याच्या मुद्यावरून (टीम इंडियानं हस्तांदोलन करणं टाळलं) आशिया कप स्पर्धेत एक वेगळाच वाद निर्माण झालाय. या प्रकरणात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सामनाधिकारी अँडी प्राइक्रॉफ्ट (Andy Pycroft) यांनी तटस्थ न राहता भारताची बाजू घेतली असा आरोप केला होता. एवढेच नाही तर त्यांना हटवण्याची मागणीही केली. जर तसे झाले नाही तर आम्ही आशिया कप स्पर्धेत खेळणार नाही, अशी धमकी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून देण्यात आली होती. 

आधी प्रेस कॉन्फरन्स रद्द, आता....

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची मागणी फेटाळल्यावर पाकिस्तानच्या संघाने UAE विरुद्धच्या मॅचआधी नियोजित पत्रकार परिषद रद्द केली होती.  पाकिस्तानची मागणी फेटाळली असली तरी भारत-पाक यांच्यातील मॅच वेळी असणारे सामनाधिकारी अँडी प्राइक्रॉफ्ट (Andy Pycroft) यांना हटवण्याऐवजी पाकिस्तानच्या सामन्यापासून त्यांना दूर ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. आशिया कप स्पर्धेतील पाकच्या सामन्यावेळी रिची रिचर्डसन यांची नियुक्ती करण्यात आल्याची गोष्टही चर्चेत आहे.  क्रिकबझच्या वृत्तानुसार, पीसीबीने (PCB) सामना एका तासाने पुढे ढकलावा अशी मागणी केली आहे. एवढेच नाही तर पाकिस्तान संघ हॉटेलमधून निघून स्टेडियमकडे रवाना झाला आहे, असेही समजते. अधिकृतरित्या यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

टॅग्स :आशिया कप २०२५एशिया कपपाकिस्तानसंयुक्त अरब अमिराती