Join us

PAK vs NZ: पाकिस्तानचा संघ जाहीर; फिक्सर किंगची एन्ट्री, शेजाऱ्यांनी उतरवला तगडा संघ

न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 18:43 IST

Open in App

PAK vs NZ T20: १८ एप्रिलपासून पाकिस्तानच्या धरतीवर न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका दोन्हीही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. येत्या जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. भारतात आयपीएल सुरू असल्याने किवी संघातील वरिष्ठ खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्याकडे कानाडोळा केला. न्यूझीलंडचा संघ आधीच जाहीर झाला होता, तर मंगळवारी पाकिस्तानी संघाची घोषणा करण्यात आली. फिक्सिंगमुळे बंदी घालण्यात आलेला मोहम्मद आमिर आगामी मालिकेत दिसणार आहे. (PAK vs NZ) 

अलीकडेच इमाद वसिम आणि मोहम्मद आमिर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतत असल्याचे जाहीर केले. दोघांनीही पाकिस्तानी संघाचा विद्यमान कर्णधार बाबर आझमवर सडकून टीका केली होती. पण, आता हे दोघेही बाबरच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने निवड समिती बरखास्त करून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. आमिरची तब्बल ४ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एन्ट्री झाली आहे. फिक्सिंग प्रकरणी त्याच्यावर आयसीसीने बंदी घातली होती. 

पाकिस्तानचा संघ -बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर झमान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद  रिझवान, मोहम्मद आमिर, मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, सैम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उसामा मीर, उस्मान खान, झमान खान, 

राखीव खेळाडू - हसीबुल्लाह, मोहम्मद वसीम ज्युनिअर, शाहिबजादा फरहान आणि सलमान अली अघा.

पाकिस्तान दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ -मायकेल ब्रेसव्हेल (कर्णधार), फिन अलेन, मार्क चॅपमन, जोश क्लार्कसन, जॅकोब डफी, डिन फॉक्सक्रॉफ्ट, बेन लिस्टर, Cole McConchie, ॲडम मिल्ने, जिमी नीशम, Will O’Rourke, टीम रॉबिन्सन, बेन सर्स, टीम सेफर्ट, इश सोधी.  

PAK vs NZ ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक 

  1. १८ एप्रिल - रावळपिंडी
  2. २० एप्रिल - रावळपिंडी
  3. २१ एप्रिल - रावळपिंडी
  4. २५ एप्रिल - लाहोर 
  5. २७ एप्रिल - लाहोर
टॅग्स :पाकिस्तानटी-20 क्रिकेटबाबर आजमन्यूझीलंड