Join us
Daily Top 2Weekly Top 5

PAK vs NZ: उप कर्णधारालाच प्लेइंग इलेव्हनमधून केलं बाहेर; पाकिस्तानच्या 'लॉजिक'ला नेटिझन्सचा सलाम

सध्या पाकिस्तानी संघ मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध वन डे मालिका खेळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 15:09 IST

Open in App

नवी दिल्ली : सध्या पाकिस्तानी संघ मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध वन डे मालिका खेळत आहे. पाकिस्तानी संघ मायदेशात किवी संघाविरूद्ध 3 सामन्यांची वन डे मालिका खेळत आहे. 9 ते 13 जानेवारी या दरम्यान ही मालिका पार पडेल. आज या मालिकेतील सलामीचा सामना खेळवला जात असून पहिल्याच सामन्यात यजमानांनी सर्वांना चकित केले. लक्षणीय बाब म्हणजे पाकिस्तानने संघाचा उप कर्णधार शान मसूदला पहिल्या सामन्यातून वगळले आहे.  

दरम्यान, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून पाहुण्या किवी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. शान मसूद हा पाकिस्तानच्या वन डे संघाचा उप कर्णधार आहे, मात्र पहिल्या सामन्यातून त्याला वगळल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली. 

आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानी संघ - बाबर आझम (कर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, मोहम्मद रिझवान, हारिस सोहेल, सलमान अली अघा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, मोहम्मद वसीम, नसीम शाह, हारिस रौफ. 

पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड वन डे मालिका -

  1. पहिला सामना - 9 जानेवारी 
  2. दुसरा सामना - 11 जानेवारी 
  3. तिसरा सामना - 13 जानेवारी 

न्यूझीलंडविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी पाकिस्तानी संघ - बाबर आझम (कर्णधार), फखर झमान, हारिस रौफ, हारिस सोहेल, इमाम उल हक, कामरान घुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, सलमान अली अघा, शाहनवाज दहानी, शान मसूद, (उप कर्णधार) तय्याब ताहिर, उसामा मीर.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

 

टॅग्स :पाकिस्तानबाबर आजमकेन विल्यमसनन्यूझीलंड
Open in App