Finn Allen कडून पाकिस्तानी गोलंदाजीची चिरफाड होणारा 1:31 मिनिटांचा Video 

PAK vs NZ 3rd T20I : पाकिस्तानची पराभवाची मालिका न्यूझीलंडमध्येही कायम राहिली आहे. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत ३-० अशी हार मानल्यानंतर पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडमध्ये दाखल झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 01:11 PM2024-01-17T13:11:09+5:302024-01-17T13:11:35+5:30

whatsapp join usJoin us
PAK vs NZ : 1:31 minutes video showcases all 16 Finn Allen sixes against Pakistan in 3rd T20I, Video | Finn Allen कडून पाकिस्तानी गोलंदाजीची चिरफाड होणारा 1:31 मिनिटांचा Video 

Finn Allen कडून पाकिस्तानी गोलंदाजीची चिरफाड होणारा 1:31 मिनिटांचा Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

PAK vs NZ 3rd T20I : पाकिस्तानची पराभवाची मालिका न्यूझीलंडमध्येही कायम राहिली आहे. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत ३-० अशी हार मानल्यानंतर पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडमध्ये दाखल झाला. जूनमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीसाठी पाकिस्तानने कंबर कसली होती, परंतु न्यूझीलंडने त्यांना जमिनीवर आपटले. तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात ४५ धावांनी विजय मिळवून ५ सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी न्यूझीलंडने घेतली. पण, हा सामना गाजवला तो फिन ॲलनने ( Finn Allen )... १६ षटकार व ५ चौकारांची आतषबाजी करून त्याने पाकिस्तानी गोलंदाजांना रडवले. 

१६ Sixes, ५ Fours! फिन ॲलनने पाकिस्तानला बेक्कार चोपले, ६२ चेंडूंत १३७ धावांसह वर्ल्ड रेकॉर्ड


फिनने अविश्वसनीय खेळी करताना ६२ चेंडूंत १३७ धावा चोपून विक्रम रचला. ट्वेंटी-२०च्या एका डावात सर्वाधिक १६ षटकार खेचण्याच्या हझरतुल्ला झाजई ( अफगाणिस्तान) याचा २०१९च्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली. न्यूझीलंडकडून ट्वेंटी-२०तील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठऱली. ब्रँडन मॅक्यूलमने २०१२ मध्ये बांगलादेशविरुद्ध १२३ धावा केल्या होत्या. फिनने मारलेल्या १६ पैकी २ षटकार हे १०० मीटर लांब गेले. सामन्यात तीन वेळा चेंडू बदलावा लागला. 


शाहिन आफ्रिदीच्या तिसऱ्या षटकात फिनने सलग दोन षटकार खेचले. त्याने हॅरिस रौफविरुद्ध आक्रमक पवित्रा आजमावला होता आणि पहिल्या षटकापासून त्याने हल्लाबोल केला. रौफच्या २ षटकांत फिनने ५१ धावा कुटल्या. सहाव्या षटकात त्याने ६,४,४,६,६,१ अशी फटकेबाजी केली.  फिनने २६ चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि ४८ चेंडूंत शतक पूर्ण केले. टीम सेईफर्टसह त्याने १२५ धावांची भागीदारी केली. सेईफर्टने ३१ चेंडूंत ६१ धावांचे योगदान दिले. १८व्या षटकात फिन बाद झाला.  



पाकिस्तानला ७ बाद १७९ धावाच करता आल्या आणि न्यूझीलंडने ४५ धावांनी हा सामना जिंकला. पाकिस्तानकडून बाबर आजमने सर्वाधिक ५८ धावा केल्या. 

 

 

 

Web Title: PAK vs NZ : 1:31 minutes video showcases all 16 Finn Allen sixes against Pakistan in 3rd T20I, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.