PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : प्रथमच आशिया चषक खेळणाऱ्या नेपाळने यजमान पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केलेली पाहायला मिळतेय. बाबर आजमने ( Babar Azam) अनुभवी फलंदाज मोहम्मद रिझवानसह पाकिस्तानचा डाव सावरला. त्यानंतर इफ्तिखार अहमदसह बाबरने दमदार फटकेबाजी करून संघाला दोनशेपार नेले. बाबरने वन डे कारकिर्दीतील १९वे शतक आज पूर्ण केले. संघ अडचणीत असताना बाबरने मॅच्युअर इनिंग्ज केली अन् साऱ्यांनी त्याचे कौतुक केले. त्याने वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली.
हास्यास्पद! मोहम्मद रिझवान बॅट क्रिजवर ठेवायलाच विसरला; R Ashwin ने घेतली शाळा, Video
फखर जमान ( १४) व इमाम-उल-हक ( ५) या सलामीवीरांना २५ धावांवरच नेपाळने माघारी पाठवले. नेपाळचा कर्णधार रोहितच्या डायरेक्ट हिटवर इमाम रन आऊट झाला. कर्णधार बाबर व मोहम्मद रिझवान या अनुभवी खेळाडूंनी पाकिस्तानचा डाव सावरला. पण, नेपाळच्या टिच्चून माऱ्यासमोर त्यांच्या धावांना वेग मिळाला नाही. या दडपणात त्यांच्याकडून चूकाही झाल्या अन् रिझवान सैरभैर झालेला दिसला. त्याच गोंधळात त्याने स्वतःची विकेट फेकली. तो ५० चेंडूंत ६ चौकारांसह ४४ धावांवर बाद झाला आणि बाबरसह त्याची ८६ धावांची ( १०६ चेंडू) भागीदारीही संपुष्टात आली. आघा सलमानही रिव्हर्स मारण्याच्या प्रयत्नात संदीप लामिछानेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला अन् पाकिस्तानला १२४ धावांवर चौथा धक्का बसला. ( बाबर आजमचे अर्धशतक )