Join us

Video: याला म्हणतात प्लॅनिंग... कव्हर्समध्ये लावले ३ फिल्डर, स्मिथने मारला फटका अन्...

PAK vs AUS: स्टीव्ह स्मिथला पाकिस्तानने बरोबर सापळ्यात अडकवलं... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 12:17 IST

Open in App

Steve Smith Out , Babar Azam Pakistan : क्रिकेट हा जगातील सर्वात अनपेक्षित खेळ मानला जातो. या खेळात कधी संघ जिंकेल असे वाटत असताना हार पदरी पडते तर कधीतरी एखादा खेळाडू पराभवाच्या तोंडातून विजयश्री खेचून आणतो. क्रिकेट या खेळात प्लॅनिंगला देखील खूप महत्त्व असते. गेल्या काही महिन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाची फिल्डिंग सुमार दर्जाची असल्यावरून बरीच टीका झाली. पण याच पाकिस्तानी संघाने योग्य प्लॅनिंग करून जगातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या फलंदाजांपैकी एक अशा स्टीव्ह स्मिथला बरोबर जाळ्यात अडकवले. त्याच्या विकेटचा व्हिडीओचा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

स्मिथविरुद्ध कव्हरला तीन फिल्डर्स

स्टीव्ह स्मिथचा फॉर्म काही काळापासून अव्वल दर्जाचा नसला तरी घरच्या मैदानावर त्याला रोखणे सोपे नसते. सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी स्टीव्ह स्मिथ खेळपट्टीवर उभा होता. तो मोठी खेळी खेळण्याच्या दिशेने वाटचाल करत होता, पण पाकिस्तानच्या कर्णधाराने त्याला बरोबर प्लॅनिंग करून बाद केले. डावखुऱ्या मीर हमजाच्या गोलंदाजीवर शान मसूदने तीन फिल्डर्स ठेवून स्मिथला झेल देण्यास भाग पाडले. हमजाच्या गोलंदाजीवर तीन फिल्डर कव्हर क्षेत्रात ठेवण्यात आले आणि ऑफसाईडला गोलंदाजी करण्यात आली. स्मिथ अतिशय संयमी खेळ करत ८५ चेंडूत ३८ धावांवर खेळ होता. पण एका चेंडूवर त्याला फटका मारण्याचा मोह आवरला नाही, त्यामुळे तो बाबर कडे झेल देत बाद झाला.

दरम्यान, पाकिस्तानी संघाने पहिल्या डावात ३१३ धावा केल्या होत्या. सलामीच्या दोन्ही फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. पण नवव्या क्रमांकावर आलेल्या आमेर जमालने 97 चेंडूत 82 धावांची खेळी केली. त्याने ९ चौकार आणि ४ षटकार मारले. मोहम्मद रिझवानने ८८ धावांचे योगदान दिले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २९९ धावांवर बाद झाला.

टॅग्स :पाकिस्तानस्टीव्हन स्मिथआॅस्ट्रेलियासोशल मीडिया