Join us

PAK vs AUS 1st Test: David Warner ने पाकिस्तानच्या मैदानात केला भांगडा; व्हिडीओ व्हायरल, चाहतेही झाले खुश (Dance Video)

पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी अनिर्णित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 17:13 IST

Open in App

PAK vs AUS, 1st Test: ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या ऐतिहासिक दौऱ्यावर आहे. रावळपिंडी येथे पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला. हा सामना अनिर्णित राहिला. फलंदाजीसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर दोन्ही संघांनी तुफान फटेकाबाजी केली. पाकिस्तानने पहिल्या डावात ४ बाद ४७६ धावांवर डाव घोषित केला. तर ऑस्ट्रेलियाने ४५९ धावा करत त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर पाकिस्ताननेही दुसऱ्या डावात नाबाद २५२ धावांची सलामी दिली आणि सामना अनिर्णित राखला. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने केलेला भांगडा डान्स चांगलाच चर्चेत होता.

डेव्हिड वॉर्नर हा अतिशय खेळकर स्वभावाचा आहे. इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया अकाऊंटवरून तो आपल्या चाहत्यांचं कायम मनोरंजन करत असतो. एखाद्या चित्रपटाच्या गाण्यावर डान्स करून किंवा एखाद्या सीनवर हावभाव करून तो त्याच्या व्हिडीओ नेहमीच पोस्ट करत असतो. मात्र पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात त्याने भर मैदानात भांगडा डान्स करून साऱ्यांचे मनोरंजन केलं. पाहा व्हिडीओ-

डेव्हिड वॉर्नर हा चाहत्यांसाठी काहीना काही वेगळं करत असतो. त्याने यावेळी थेट भांगडा करत चाहत्यांचं मनोरंजन केलं. त्यामुळे चाहतेही त्याच्या डान्सवर फिदा झाल्याचं दिसून आलं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्वत: हा व्हिडीओ ट्वीट केला असून डेव्हिड वॉर्नर यात झकासपैकी डान्स करताना दिसतोय.

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरपाकिस्तानआॅस्ट्रेलिया
Open in App