T20I Tri-Series 2025 : पाकचा 'करेक्ट कार्यक्रम'; राशिद खानचा अफगाणिस्तान संघ पोहचला टॉपला

PAK AFG UAE T20I Tri-Series 2025 : पाककडून बॉलर बॅटरपेक्षा भारी खेळला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 01:43 IST2025-09-03T01:37:42+5:302025-09-03T01:43:09+5:30

whatsapp join usJoin us
PAK AFG UAE T20I Tri-Series 2025 Rashid Khan Lead Afghanistan Defeats Pakistan By 18 Runs Ibrahim Zadran Sediqullah Atal Fifty | T20I Tri-Series 2025 : पाकचा 'करेक्ट कार्यक्रम'; राशिद खानचा अफगाणिस्तान संघ पोहचला टॉपला

T20I Tri-Series 2025 : पाकचा 'करेक्ट कार्यक्रम'; राशिद खानचा अफगाणिस्तान संघ पोहचला टॉपला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Afghanistan Defeats Pakistan By 18 Runs T20I Tri-Series 2025 : आशिया कप स्पर्धेआधी युएईत सुरु असलेल्या टी-२० तिरंगी मालिकेतील चौथ्या सामन्यात राशिद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानच्या संघानं पाकिस्तानला १८ धावांनी पराभूत करुन दाखवलं आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने अफगाणिस्तान विरुद्ध विजयी सलामी दिली होती. या पराभवाचा वचपा काढत अफगाणिस्तानच्या संघाने पाक विरुद्ध चौथा विजय नोंदवला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!


पाककडून बॉलर बॅटरपेक्षा भारी खेळला, पण...

या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना सेदीकुल्ला अटल (Sediqullah Atal) ६४ (४५) आणि इब्राहिम झदरान (Ibrahim Zadran) ६५ (४५) या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर अफगाणिस्तानच्या संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात १६९धावा करत पाकिस्तानसमोर १७० धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात १५१ धावांपर्यंतच मजल मारू शकला. तळाच्या फलंदाजीत  हॅरिस राउफनं १६ चेंडूत ४ षटकारांच्या मदतीने  नाबाद ३४ धावांची खेळी केली. पाक गोलंदाजाने केलेली ही खेळी संघातील प्रमुख बॅटरच्या तुलनेतही सर्वोत्तम ठरली. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अफगाणिस्तानच्या संघाकडून गोलंदाजीत कॅप्टन राशिद खान, फझलहक फारूखी, मोहम्मद नबी आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.  

रॅपिड फायर राउंडमध्ये कोच गंभीरची 'बोलंदाजी'; किंग कोहलीला 'देसी बॉय'चा टॅग अन् बरंच काही (VIDEO)

गुणतालिकेत अफगाणिस्तान संघ टॉपला

अफगाणिस्तानच्या संघाने पाक विरुद्धचा सामना तर जिंकलाच. पण टी-२० तिरंगी मालिकेत ३ पैकी २ विजयासह ४ गुण आपल्या खात्यात जमा करत सर्वोत्तम रनरेटच्या जोरावर गुणतालिकेत अव्वलस्थानही पटकावले आहे. पाकिस्तानचा संघ ३ पैकी २ विजयासह४ गुण मिळवत दुसऱ्या स्थानावर आहे. यजमान युएईच्या संघाने पहिले दोन्ही सामने गमावले असून ते तळाला आहेत.

आशिया कप स्पर्धेआधी पाकसाठी धोक्याची घंटा

आतापर्यंत टी-२० मध्ये हे दोन संघ ९ वेळा समोरासमोर आले आहेत. अफगाणिस्तानच्या संघाने २४ मार्च २०२३ मध्ये युएईतील टी-२०  तिरंगी मालिकेत पहिल्यांदा पाकला ६ विकेट्सने पराभूत केले होते. याच मालिकेत अफगाणिस्तानच्या संघाने २६ मार्चला पाकला ७ विकेट्स राखून दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का दिला होता. ६ ऑक्टोबर २०२३ रोजी आशियाई गेम्समध्ये अफगाणिस्तानच्या संघाने ४ विकेट्स राखून विजय नोंदवला होता. आता पहिल्यांदाच धावांचा बचाव करत अफगाणिस्तानच्या संघाने पाकला रोखून दाखवत चौथ्या विजयाची  नोंद केली आहे. या विजयासह अफगाणिस्तान संघाने मालिकेतील आपली दावेदारी भक्कम केली असून आशिया कप स्पर्धेआधी पाकसाठी धोक्याची घंटाही वाजली आहे. 

Web Title: PAK AFG UAE T20I Tri-Series 2025 Rashid Khan Lead Afghanistan Defeats Pakistan By 18 Runs Ibrahim Zadran Sediqullah Atal Fifty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.