Join us  

विमानातून आलेल्या 'भावा'ला सन्मानाने परत पाठवलं; अजून काय करायला हवं?; आफ्रिदीची बडबड सुरूच

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 5:34 PM

Open in App

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला आहे. नुकतंच त्यानं पाकव्याप्त काश्मीर खोऱ्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वादग्रस्त विधान केलं होतं. त्याच्यावर गौतम गंभीर, युवराज सिंग, हरभजन सिंग, सुरेश रैना आणि शिखर धवन यांनी जोरदार टीका केली. युवी आणि भज्जीनं पाकिस्तानी खेळाडूशी मैत्री तोडली. गेल्या काही दिवसांपासून आफ्रिदीची विधानं पाहता तो राजकारणात जाणार असल्याचीही चर्चा आहे. त्यात त्यानं आणखी एक विधान करून भारतीयांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. 

शाहिद आफ्रिदीनं पुन्हा गरळ ओकली; भारतीयांबद्दल केलं वादग्रस्त विधान!

पाकिस्तानच्या प्रशिक्षकानं सुचवला जुगाड; चेंडूला थूंकी लावण्याची गोलंदाजांची मोडेल सवय!

युवी, भज्जीकडे मदत मागायची अन् त्यांच्या पंतप्रधानांवर टीका करायची; आफ्रिदीवर पाक खेळाडू बरसला

राजकारणात येणार का?''मला राजकारणाच यायचेच असते, तर मी फार आधी आलो असतो. अनेक राजकीय पक्षांची मला ऑफर होती. लोकांना मदत करून मी राजकारण्यांचंच काम करतोय. त्यामुळे सर्व पक्ष आणि लोकं मला पाठींबा देत आहेत, परंतु माझी कोणतीही राजकीय महत्त्वकांक्षा नाही. मला फक्त लोकांना मदत करायची आहे,''असे आफ्रिदीनं सांगितले.

तो पुढे म्हणाला,''पंतप्रधान इम्रान खान हे पाकिस्तानी जनतेचे आशास्थान आहेत आणि येथील मुलांना उज्ज्वल भविष्याची आशा आहे. इम्रान भाई प्रामाणिकपणे त्यांचं काम करत आहेत आणि देशभक्त म्हणून आपल्याला त्यांना पाठींबा द्यायला हवा.''

यावेळी आफ्रिदीनं पुन्हा एकदा भारताला अप्रत्यक्ष टोला लगावला. भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या नावाचा उल्लेख न करता आफ्रिदीनं भारतीयांना खोचक सवाल केला आहे. तो म्हणाला,''यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते? एक भाऊ विमानानं इथे आला आणि आम्ही त्याला चहा दिला व सन्मानानं घरी पाठवले. त्यांनी त्याला हिरो बनवलं. अजून आम्ही काय करायला हवं?'' 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Shocking : पदार्पणात हॅटट्रिक घेणाऱ्या गोलंदाजावर क्रिकेट मंडळाकडून बंदीची कारवाई

कृपया ऑस्ट्रेलियाविरुद्ध नको! ब्रेट लीनं केली रोहित शर्माकडे Special विनंती

भारतीय क्रिकेटपटू झाला 'बाप माणूस'; सोशल मीडियावरून दिली गोड बातमी

धक्कादायक; त्या एका फुटबॉल सामन्यामुळे 41 जणांचा कोरोनानं मृत्यू

OMG : अंधविश्वासाच्या मर्यादा ओलांडल्या; सामन्यापूर्वी 'हा' खेळाडू करतो किळसवाणी गोष्ट!

खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला तरीही मालिका रद्द होता कामा नये; राहुल द्रविड

टॅग्स :शाहिद अफ्रिदीअभिनंदन वर्धमानपाकिस्तानइम्रान खान