Shehan Madushanka suspended from all forms of cricket for possession of heroin svg | Shocking : पदार्पणात हॅटट्रिक घेणाऱ्या गोलंदाजावर क्रिकेट मंडळाकडून बंदीची कारवाई

Shocking : पदार्पणात हॅटट्रिक घेणाऱ्या गोलंदाजावर क्रिकेट मंडळाकडून बंदीची कारवाई

श्रीलंकेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शेहान मदुशंका याला रविवारी श्रीलंकन पोलिसांनी ड्रग्स बाळगल्याप्रकरणी अटक केली. AFP नं दिलेल्या वृत्तानुसार मदुशंका याला दोन आठवड्यांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश स्थानिक न्यायालयानं दिले आहेत. श्रीलंकेतील पन्नाला शहरात त्याला ही अटक करण्यात आली. तिथे तो लॉकडाऊन असूनही एका व्यक्तीसोबत कार चालवताना दिसला. या वृत्तानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डानंही कठोर पाऊल उचललं आहे. त्यानी शेहानला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून तात्काळ निलंबित केलं आहे. 

शाहिद आफ्रिदीनं पुन्हा गरळ ओकली; भारतीयांबद्दल केलं वादग्रस्त विधान!

लाईफ झिंगालाला... क्रिकेट सामन्यांनी 'या' मुलींना बनवलं रातोरात स्टार!

कोरोना व्हायरसशी जगाप्रमाणे श्रीलंकाही लढा देत आहे. तेथील सरकारनं अनेक ठिकाणी लॉकडाऊन जाहीर केला आहे. पण, तरीही मदुशंका नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवत होता. त्याच्याकडे दोन ग्राम हिरोइन सापडले. त्यानं 2018मध्ये बांगलादेशविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानं पहिल्या सामन्यात हॅटट्रिक घेतली, परंतु दुखापतीमुळे त्याला कमबॅक करता आले नाही. त्यानं 2 ट्वेंटी-20 सामन्यांत दोन विकेट्स घेतल्या आहेत. 

आता लंकन बोर्डानं मंगळवारी ट्विटरद्वारे शेहानवर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती दिली. तसेच श्रीलंकन क्रिकेट बोर्ड या प्रकरणाची चौकशी करणार आहे आणि तो पर्यंत शेहानला कोणत्याही क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक; त्या एका फुटबॉल सामन्यामुळे 41 जणांचा कोरोनानं मृत्यू

OMG : अंधविश्वासाच्या मर्यादा ओलांडल्या; सामन्यापूर्वी 'हा' खेळाडू करतो किळसवाणी गोष्ट!

खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला तरीही मालिका रद्द होता कामा नये; राहुल द्रविड

पाकिस्तानच्या प्रशिक्षकानं सुचवला जुगाड; चेंडूला थूंकी लावण्याची गोलंदाजांची मोडेल सवय!

युवी, भज्जीकडे मदत मागायची अन् त्यांच्या पंतप्रधानांवर टीका करायची; आफ्रिदीवर पाक खेळाडू बरसला

कृपया ऑस्ट्रेलियाविरुद्ध नको! ब्रेट लीनं केली रोहित शर्माकडे Special विनंती

भारतीय क्रिकेटपटू झाला 'बाप माणूस'; सोशल मीडियावरून दिली गोड बातमी

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shehan Madushanka suspended from all forms of cricket for possession of heroin svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.