युवी, भज्जीकडे मदत मागायची अन् त्यांच्या पंतप्रधानांवर टीका करायची; आफ्रिदीवर पाक खेळाडू बरसला

राजकारणात जायचं असेल तर क्रिकेट सोड, असा सल्ला दिला..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 12:26 PM2020-05-26T12:26:08+5:302020-05-26T12:37:42+5:30

whatsapp join usJoin us
Danish Kaneria slams Shahid Afridi's PoK speech, questions his 'friendship' with Harbhajan, Yuvraj Singh svg | युवी, भज्जीकडे मदत मागायची अन् त्यांच्या पंतप्रधानांवर टीका करायची; आफ्रिदीवर पाक खेळाडू बरसला

युवी, भज्जीकडे मदत मागायची अन् त्यांच्या पंतप्रधानांवर टीका करायची; आफ्रिदीवर पाक खेळाडू बरसला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानचा माजी अष्पटैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं नुकतंच बेताल वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग व हरभजन सिंग यांनी त्याच्याशी मैत्री तोडली. त्यावरून आता पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कानेरिया यानं आफ्रिदीला सुनावलं आहे. त्यानं युवराज व भज्जीसोबतच्या त्याच्या मैत्रीवर प्रश्न उपस्थित केला. 

Pakistan Plane Crash : शाहिद आफ्रिदीनं दिली घटनास्थळी भेट, पाकिस्तानी फॅन्सनी घेतला समाचार

''कोणतंही विधान करण्यापूर्वी शाहिद आफ्रिदीनं विचार करायला हवा. जर त्याला राजकारणात जायचं आहे, तर त्यानं क्रिकेटशी संबंध तोडावेत. राजकिय भाष्य करायचे असेल तर त्यानं क्रिकेटपासून दूर राहायला हवं. त्याच्या वक्तव्यामुळे केवळ भारतातच नव्हे, तर जगात पाकिस्तानची नकारात्मक प्रतिमा तयार होत आहे,''असे कानेरिया म्हणाला. 

Video : दहा दिवसांचा पंतप्रधान बनवल्यास काय करशील? शाहिद आफ्रिदीनं सांगितली दोन टार्गेट!

हिंदू असल्यामुळे पाकिस्तान संघातील खेळाडूंकडून दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी कानेरियानं केला होता. आता कानेरियानं आफ्रिदीवर टीका केली आहे. ''ऐकिकडे युवराज आणि भज्जीकडून मदत मागायची आणि नंतर त्यांच्या देशाबद्दल व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करायची; ही अशी कशी मैत्री?,''असा सवाल कानेरियानं विचारला.

शाहिद आफ्रिदीच्या त्या वक्तव्यानंतर भारताच्या क्रिकेटपटूंनी त्याला खडेबोल सुनावले होते. गौतम गंभीर, हरभजन सिंग, सुरेश रैना, शिखर धवन, युवराज सिंग आदींनी आफ्रिदीवर जोरदार टीका केली.

दरम्यान,  आफ्रिदीचे आणखी एक धक्कादायक विधान समोर येत आहे. क्रिकेट कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात पाकिस्तान सुपर लीगमध्ये काश्मीर संघाचे नेतृत्व करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. तो म्हणाला," पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मी विनंती करू इच्छितो की पुढच्या वेळेस पाकिस्तान सुपर लीगमध्ये काश्मीर संघाचा समावेश करा. पाकिस्तान सुपर लीगमधील माझ्या अखेरच्या वर्षात मला त्या संघाचे नेतृत्व करायचे आहे."तो पुढे म्हणाला,"काश्मीरमध्ये स्टेडियम असेल तर तिथे क्रिकेट अकादमी असायला हवी आणि मी कराचीहून येथी प्रशिक्षण देण्यासाठी येण्यास तयार आहे. या विभागात १२५ क्लब आहेत असं मी एकलं आहे. त्यातून संघाला चांगले खेळाडू मिळू शकतील."

अन्य महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक; त्या एका फुटबॉल सामन्यामुळे 41 जणांचा कोरोनानं मृत्यू

OMG : अंधविश्वासाच्या मर्यादा ओलांडल्या; सामन्यापूर्वी 'हा' खेळाडू करतो किळसवाणी गोष्ट!

खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला तरीही मालिका रद्द होता कामा नये; राहुल द्रविड

पाकिस्तानच्या प्रशिक्षकानं सुचवला जुगाड; चेंडूला थूंकी लावण्याची गोलंदाजांची मोडेल सवय!

Web Title: Danish Kaneria slams Shahid Afridi's PoK speech, questions his 'friendship' with Harbhajan, Yuvraj Singh svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.