कोलकाता : एखाद्या खेळाडूच्या डोक्याला चेंडू लागला तर अजूनही ऑस्ट्रेलियाच्या फिलीप ह्युजची आठवण आल्यावाचून राहत नाही. अशीच काहीशी घटना भारतामध्येही घडली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज अशोक दिंडाच्या डोक्याला चेंडू लागल्याची घटना घडली आहे.
भारतामध्ये सध्याच्या घडीला मुश्ताक अली अजिंक्यपद स्पर्धेची चर्चा आहे. या स्पर्धेसाठी बंगलाच्या संघाचा एका ट्वेन्टी-20 सामना सुरु होता. हा सामना कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानात सुरु होता. यावेळी दिंडा हा गोलंदाजी करत होता. दिंडाने फलंदाजाला एक चेंडू टाकला. फलंदाजाने तो चेंडू जोरात मारला. हा चेंडू थेट गोलंदाजी करत असलेल्या दिंडाच्या दिशेने गेला आणि त्याच्या डोक्यावर बसला. यावेळी दिंडावर प्रथमोपचार करण्यात आले, त्यांतर त्याची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली. या चाचणीनंतर दिंडाला झालेली दुखापत ही गंभीर स्वरुपाची नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
पाहा हा व्हिडीओ