क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! सेमी फायनलमध्ये पाऊस आला तरी निकाल लागणार; ICC चा मोठा निर्णय

World Cup 2023 : उपांत्य फेरीत प्रवेश करणारे चार संघ किताबासाठी भिडणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 12:09 PM2023-11-14T12:09:25+5:302023-11-14T12:09:45+5:30

whatsapp join usJoin us
odi world cup 2023 ICC CONFIRMS THE RESERVE DAYS FOR SEMIS ind vs nz and aus vs sa AND FINAL  | क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! सेमी फायनलमध्ये पाऊस आला तरी निकाल लागणार; ICC चा मोठा निर्णय

क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! सेमी फायनलमध्ये पाऊस आला तरी निकाल लागणार; ICC चा मोठा निर्णय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand 1st Semi-FinaL : वन डे विश्वचषक आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. उपांत्य फेरीत प्रवेश करणारे चार संघ किताबासाठी भिडणार आहेत. उपांत्य फेरीतील पहिला सामना यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आमनेसामने असेल. भारतीय संघाने सलग नऊ विजय मिळवत स्पर्धेत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

वन डे विश्वचषक स्पर्धेतील दोन उपांत्य फेरीतील पहिला सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. या दोन्ही सामन्यांच्या पूर्वसंध्येला आयसीसीने एक मोठा निर्णय घेतला असून क्रिकेटप्रेमींना खुशखबर दिली आहे. कारण आता सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तरी निकाल लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लक्षणीय बाब म्हणजे दोन्ही उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी राखीव दिवस असणार आहे अर्थात जर सामन्याच्या दिवशी पाऊस आला तरी उर्वरित सामना राखीव दिवशी खेळवला जाईल. तसेच अंतिम सामन्यासाठी देखील राखीव दिवस असणार आहे.

राखीव दिवशीही पाऊस झाला तर...
राखीव दिवशीही सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि दोन्ही दिवशी सतत पाऊस पडत राहिला तर गुणतालिकेत चांगले स्थान असलेल्या संघाला फायदा होईल आणि तो पुढील फेरीत जाईल. उदाहरणार्थ, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या उपांत्य सामन्यादरम्यान दोन्ही दिवशी पाऊस पडला, तर अशा स्थितीत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेला भारतीय संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडला बाहेरचा रस्ता धरावा लागेल.

भारताची ऐतिहासिक कामगिरी
भारतीय संघाने विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. आपल्या अखेरच्या सामन्यात नेदरलँड्सविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने ४ गडी गमावून ४१० धावांची विशाल धावसंख्या उभारली. श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनी शतकी खेळी करून भारताच्या नवव्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अय्यरने नाबाद १२८ धावा केल्या तर राहुलने १०२ धावांचे योगदान दिले. ४११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ २५० धावांत आटोपला. स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्वातील नेदरलँड्सला यंदाच्या विश्वचषकात ९ सामन्यांमध्ये २ विजय मिळवता आले. पण, नेदरलँड्सने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारून क्रिकेट विश्वाला धक्का दिला. त्यांनी आफ्रिकेला ३८ तर बांगलादेशला ८७ धावांनी पराभूत केले. 

Web Title: odi world cup 2023 ICC CONFIRMS THE RESERVE DAYS FOR SEMIS ind vs nz and aus vs sa AND FINAL 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.