Join us

IND vs NZ Series: "पृथ्वी शॉला लवकरच भारतीय संघात स्थान मिळेल", निवड समितीच्या अध्यक्षांनी दिले संकेत

राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघांची घोषणा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 20:00 IST

Open in App

India Squad NZ Series । नवी दिल्ली : राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघांची घोषणा केली आहे. टी-20 मालिकेत हार्दिक पांड्या भारताचे नेतृत्व करणार आहे तर शिखर धवनकडे एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा असेल. रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि विराट कोहलीला न्यूझीलंड मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. संजू सॅमसनचेही न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी पुनरागमन झाले आहे. मात्र त्याला बांगलादेश दौऱ्यातून वगळण्यात आले आहे. याशिवाय उमरान मलिकलाही जागा मिळाली आहे.  

पाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेला दीपक चहर बांगलादेश दौऱ्यातून संघात परतणार आहे. मात्र जसप्रीत बुमराहचे अद्याप पुनरागमन झाले नाही. तो डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी मायदेशात परतण्याची शक्यता आहे. लक्षणीय बाब म्हणजे आगामी 4 मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. मात्र यातील एकाही संघात पृथ्वी शॉला स्थान मिळाले नाही. यावरूनच राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी म्हटले, "पृथ्वी शॉ लवकरच भारतीय संघात असेल."

 न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी टी-20 संघ -हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत, शुबमन गिल, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी एकदिवसीय संघ -शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ICC टी-20 विश्वचषक 2022 नंतर भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना होईल. तिथे दोन्ही संघ 18 नोव्हेंबरला पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहेत. 13 दिवसांच्या कालावधीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकूण 6 सामने होतील. 13 नोव्हेंबर 2022 रोजी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे. 

भारत विरूद्ध न्यूझीलंड वेळापत्रक 18 नोव्हेंबर - पहिला टी-20 सामना, स्काय स्टेडियम, वेलिंग्टन, रात्री 7.30 वाजल्यापासून 20 नोव्हेंबर - दुसरा टी-20 सामना, माउंट मौनगानुई, रात्री 7.30 वाजल्यापासून22 नोव्हेंबर - तिसरा टी-20 सामना, मॅक्लीन पार्क, नेपियर, रात्री 7.30 वाजल्यापासून25 नोव्हेंबर - पहिला एकदिवसीय सामना, ईडन पार्क, ऑकलंड,  दुपारी 2.30 वाजल्यापासून 27 नोव्हेंबर - दुसरा एकदिवसीय सामना, सेडन पार्क, हॅमिल्टन, दुपारी 2.30 वाजल्यापासून 30 नोव्हेंबर - तिसरा एकदिवसीय सामना, हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च, दुपारी 2.30 वाजल्यापासून 

बांगलादेशविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघरोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, ईशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल. 

बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ  रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

भारताच्या बांगलादेश दौऱ्याचे वेळापत्रक 

1 डिसेंबर - भारतीय संघ बांगलादेशला पोहचेल4 डिसेंबर - पहिला एकदिवसीय सामना, ढाका7 डिसेंबर - दुसरा एकदिवसीय सामना, ढाका10 डिसेंबर - तिसरा एकदिवसीय सामना, ढाका14-18 डिसेंबर - पहिला कसोटी सामना, चटगाव22-26 डिसेंबर - दुसरा कसोटी सामना, ढाका27 डिसेंबर - भारतीय संघ मायदेशी परतण्यासाठी रवाना होईल 

 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडभारत विरुद्ध बांगलादेशबीसीसीआयपृथ्वी शॉभारतीय क्रिकेट संघ
Open in App