Indian Cricketer Parvez Rasool Retires From All Formats Of Cricket : भारतीय संघाकडून पदार्पणात इतिहास रचणाऱ्या क्रिकेटपटूनं क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३६ वर्षीय परवेझ रसूल याने बीसीसीआयला आपल्या निवृत्तीसंदरभातील माहिती दिली आहे. भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पणासह या क्रिकेटरच्या नावे IPL मध्ये पदार्पणाचा एक खास रेकॉर्ड आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
३५२ विकेट्स आणि ५६४८ धावा, टीम इंडियासह आयपीएलमध्ये एन्ट्रीसह रचला होता इतिहास
टीम इंडियासह आयपीएलमध्ये खेळणारा तो जम्मू काश्मीरचा पहिला क्रिकेटर आहे. भारतीय संघाकडून त्याला फारशी संधी मिळाली नाही. पण प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १७ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने ३५२ विकेट्स आणि ५६४८ धावा करत क्रिकेटच्या मैदानात आपली खास छाप सोडली आहे.
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, “पुढे दोघांनी ही गोष्ट केली तरी आश्चर्यचकित होऊ नका!
टीम इंडियाकडून कधी अन् किती सामने खेळले?
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये परवेझ रसूल याने दमदार कामगिरी केली असतील तरी भारतीय संघाकडून त्याला फक्त दोन सामन्यात संधी मिळाली. आपल्या मोठ्या कारकिर्दीत हा खेळाडू फक्त एक वनडे आणि एक टी-२० सामना खेळला आहे. सुरेश रैनाच्या नेतृत्वाखालील टीम इंडियात २०१४ मध्ये १५ जूनला बागंलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याला वनडेत पदार्पणाची संधी मिळाली. हा वनडेतील त्याच्यासाठी पहिला आणि अखेरचा सामना ठरला. या सामन्यात १० षटकांच्या कोट्यात त्याने ६० धावा खर्च करून २ विकेट्स घेतल्या होत्या त्यानंतर २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचा सामना खेळला. या सामन्यात ४ षटकांच्या कोट्यात ३२ धावा खर्च करत त्याने इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनची विकेट घेतली होती.
IPL मध्ये पुण्याच्या संघाकडून मिळाली होती संधी
परवेझ रसूल याने २०१२-१३ मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये जम्मू काश्मिरच्या संघाकडून खास कामगिरीसह सर्वांचे लक्षवेधून घेतले होते. या हंगामा त्याने ५९४ धावा आणि ३३ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले. या कामगिरीच्या जोरावर त्याची टीम इंडियात एन्ट्री झाली. त्यानंतर त्याला IPL मधील पुणे वॉरियर्स फ्रँचायझीनं आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. IPL मध्ये ११ सामन्यात त्याला फक्त ४ विकेट्स मिळवता आल्या.
Web Summary : Parvez Rasool, the first cricketer from Jammu & Kashmir to play for India and in the IPL, has retired. He played one ODI and one T20I for India, also representing Pune Warriors in the IPL. He scored 5648 runs and took 352 wickets in his career.
Web Summary : जम्मू-कश्मीर के पहले क्रिकेटर परवेज रसूल ने संन्यास लिया। उन्होंने भारत के लिए एक वनडे और एक टी20 खेला, और आईपीएल में पुणे वॉरियर्स का प्रतिनिधित्व किया। उन्होंने अपने करियर में 5648 रन बनाए और 352 विकेट लिए।