Join us

"ICC ट्रॉफी जिंकलो नाही याचा अर्थ..," WTC 2023 फायनल पूर्वी राहुल द्रविड यांचं मोठं वक्तव्य

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीप २०२३ च्या अंतिम सामन्याबाबत मोठं वक्तव्य केलंय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 09:38 IST

Open in App

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीप २०२३ च्या अंतिम सामन्याबाबत मोठं वक्तव्य केलंय. "आम्ही काही वर्षांत आयसीसी ट्रॉफी जिंकलो नाही, याचा अर्थ आम्ही चांगलं क्रिकेट खेळलो नाही असा होत नाही," असं राहुल द्रविड म्हणाले. 

"ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकणं, इंग्लंडमधील मालिका बरोबरीत सोडवणं, यांसारख्या गोष्टींकडे पाहा. गेल्या ५-६ वर्षांमधील कामगिरी पाहा. या त्या गोष्टी आहेत ज्या कधीही बदलणार नाहीत, तुमच्याकडे आयसीसी ट्रॉफी नाही. आम्ही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलो नाही, याचा अर्थ तुम्ही चांगलं खेळला नाहीत असा होत नाही," असं द्रविड यांनी स्पष्ट केलं.

राहुल द्रविड यांच्यासमोर मुख्य प्रशिक्षक म्हणून आव्हानदेखील आहे, कार ९ महिन्यांच्या कालावधीत दुसऱ्यांदा भारतीय संघ आयसीसीच्या इव्हेंटच्या नॉकआऊटमध्ये आहे. यावेळी भारतीय संघ फायनलमध्ये खेळत आहे. यापूर्वी आयसीसी टी२०वर्ल्ड कप २०२२ मध्ये सेमीफायनलमध्येच भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आता भारतीय संघाचं लक्ष्य वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपवर असणार आहे. 

टॅग्स :राहुल द्रविडभारतीय क्रिकेट संघ
Open in App