डेवोन कॉनवेचे पदार्पणात द्विशतक; न्यूझीलंडची पहिल्या डावात ३७८ धावांची मजल

हेन्री निकोल्सी ६१ धावांची खेळी; इंग्लंड चहापानापर्यंत २ बाद २५ धावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 06:15 AM2021-06-04T06:15:30+5:302021-06-04T06:15:55+5:30

whatsapp join usJoin us
New Zealands Devon Conway Breaks Sourav Gangulys 25 Year Old Lords Record On Test Debut | डेवोन कॉनवेचे पदार्पणात द्विशतक; न्यूझीलंडची पहिल्या डावात ३७८ धावांची मजल

डेवोन कॉनवेचे पदार्पणात द्विशतक; न्यूझीलंडची पहिल्या डावात ३७८ धावांची मजल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन : पदार्पणाची कसोटी खेळणारा न्यूझीलंडचा सलामीवीर डेवोन कॉनवेच्या (२०० धावा, ३४७ चेंडू, २२ चौकार, १ षटकार) द्विशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी गुरुवारी उपहारानंतर पहिल्या डावात ३७८ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात  इंग्लंडची चहापानापर्यंत पहिल्या डावात २ बाद २५ अशी स्थिती झाली होती.

न्यूझीलंडची एकवेळ ३ बाद २८८ अशी दमदार स्थिती होती, पण  वुड व ओली रॉबिनसन यांनी इंग्लंडला पुनरागमनची संधी मिळवून दिली. कॉनवेने वँगरनसोबत (नाबाद २५) अखेरच्या गड्यासाठी ४० धावांची भागीदारी करीत संघाला पावने चारशेचा पल्ला ओलांडून दिला. कॉनवे वैयक्तिक द्विशतक पूर्ण झाल्यानंतर धावबाद झाला. 

कॉनवेने मोडला गांगुलीचा २५ वर्षे जुना विक्रम
क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर न्युझीलंडचा डावखुरा फलंदाज डेवोन कॉनवे याने बुधवारी शतक झळकावले. २५ वर्षांपूर्वी टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने केलेला विक्रम कॉनवेने मोडला. पदार्पणात पहिल्या दिवशी शतक ठोकून या मैदानावर सर्वात मोठा डाव खेळणारा पहिला परदेशी फलंदाज ठरला.

राॅबिन्सनचा माफीनामा
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिनसनने वंशद्वेष आणि लैंगिकतेबद्दलच्या जुन्या ट्विटबद्दल दिलगिरी व्यक्त केली. 

पदार्पणात सर्वाधिक खेळी 
२८७ टीम फॉस्टर इंग्लंड (विरुद्ध ऑस्ट्रेलिया १९०३-०४)
नाबाद २२२ जॅक्वेस रुडॉल्फ दक्षिण आफ्रिका (विरुद्ध बांगलादेश २००३)
२१४ लॉरेन्स रोव्हे वेस्ट इंडिज (विरुद्ध न्यूझीलंड १९७१-७२)
२१४ मॅथ्यू सिनक्लेयर न्यूझीलंड (विरुद्ध वेस्ट इंडिज १९९९-२०००)
नाबाद २०१ ब्रेन्डन कुरुप्पू श्रीलंका (विरुद्ध न्यूझीलंड १९८७)
२०० डेवॉन कॉनवे न्यूझीलंड (विरुद्ध इंग्लंड २०२१)

संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड (पहिला डाव) १२२.४ षटकात सर्वबाद ३७८ (डेवोन कॉनवे २००, निकोल्स ६१, वँगनर नाबाद २५, ओली रॉबिन्सन ४-७५, वुड ३-८१, अँडरसन २-८३). इंग्लंड पहिला डाव २ बाद २५ (सिब्ले ०, क्रॉवली २, साऊदी व जेमिसन प्रत्येकी १ बळी).

Web Title: New Zealands Devon Conway Breaks Sourav Gangulys 25 Year Old Lords Record On Test Debut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.