Join us

NZ vs AUS : न्यूझीलंडच्या धावफलकावर फुटबॉल स्कोअर! मग २३ वर्षीय पठ्ठ्यानं ठोकली वादळी सेंच्युरी, पण..

२३ वर्षीय पठ्ठ्यानं १३ व्या सामन्यात झळकावलं टी-२० कारकिर्दीतील पहिले शतक, तेही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 16:48 IST

Open in App

New Zealand vs Australia 1st T20I, Tim Robinson Maiden T20I Century :  न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना माऊंट माउंगानुई येथील बे ओव्हल स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्यास मैदानात उतरलेल्या यजमान न्यूझीलंड संघाला पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघातील गोलंदाजांनी सुरुवातीला धक्क्यावर धक्के दिले. अवघ्या ६ धावांवर ऑस्ट्रेलियन संघाने ३ विकेट्स गमावल्या होत्या. धावफलकावर ६-३ अशी फुटबॉल स्कोअर दिसत असताना टिम रॉबिन्सनं याने तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश केला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

२३ वर्षीय पठ्ठ्यानं १३ व्या सामन्यात झळकावलं टी-२० कारकिर्दीतील पहिले शतक, तेही...

न्यूझीलंडच्या ताफ्यातील २३ वर्षीय बॅटर टिम रॉबिन्सन याने वादळी शतक झळकावले. ५ षटकार आणि ६ चौकाराच्या मदतीने ६६ चेंडूत १०६ धावांची खेळी करत त्याने संघाला सुरुवातीच्या धक्क्यातून सावरले. गत वर्षी पाकिस्तान दौऱ्यातून टी-२० पदार्पण करणाऱ्या उजव्या हाताच्या फलंदाजाने एक हाती किल्ला लढवताना टी-२० कारकिर्दीतील पहिले शतक साजरे केले. याआधी त्याच्या खात्यात दोन अर्धशतकांची नोंद होती. शेवटी त्याची ही शतकी खेळी व्यर्थच ठरली. पण त्याच्या या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाने निर्धारित २० षटकात १८१ धावा केल्या. अल्प धावसंख्येत आटोपण्याचं संकट या युवा बॅटरनं दूर केलं.

ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

 शतकावर भारी पडली मार्शची अर्धशतकी खेळी

न्यूझीलंडच्या संघाने सेट केलेल्या १८२ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने अगदी सहज विजय मिळवला. कर्णधार  मिचेल मार्शनं ४३ चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकाराच्या मदीने ८५ धावांची खेळी केली. याशिवाय ट्रॅविस हेड ३१ (१८), मॅथ्यू शॉर्ट २९ ( १८) आणि टीम डेविड यांनी २१ (१२ ) उपयुक्त धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्स आणि २१ चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Robinson's Century in Vain as Australia Defeats New Zealand in T20

Web Summary : Tim Robinson's maiden T20I century couldn't save New Zealand. Australia chased down the target, led by Mitchell Marsh's explosive innings, winning by 6 wickets and taking a 1-0 series lead.
टॅग्स :टी-20 क्रिकेटन्यूझीलंडआॅस्ट्रेलिया