New Zealand vs Afghanistan ICC T20 World Cup 2026 Group D Matches Live Streaming Details : आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या दिवशी डेथ ग्रुपमधील सहा संघ आपल्या यंदाच्या मोहिमेची सुरुवात करताना दिसतील. पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात रंगणार आहे. इथं एक नजर टाकुयात ८ फेब्रुवारी, २०२६ रोजी कोणता संघ कधी आणि कुणाविरुद्ध भिडणार? डेथ ग्रुपमधील सामने LIVE कसे पाहता येतील? यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कुठं अन् कधी रंगणार न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील चौथा सामना?
न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील चौथा सामना चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान याने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. फिरकीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर न्यूझीलंडला शह देत अफगाणिस्तान चमत्कार करण्यासाठी तयार असेल. दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघही संतुलित असून तेही यंदाच्या हंगामाची सुरुवात विजयाने करण्यासाठी प्रयत्नशील असतील.
"मियाँ, बॅग पॅक कर आणि मुंबईला ये…" सिराज म्हणाला; 'प्लीज सूर्या भाई, अशी थट्टा करू नकोस!'
कुठे अन् कसे पाहता येतील डेथ ओव्हर्समधील सर्व लढती
न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानशिवाय दुपारच्या सत्रात इंग्लंड विरुद्ध नेपाळ यांच्यातील लढत मुंबईतील वानखेडेच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. सायंकाळच्या सत्रात भारतासोबतचा संयुक्त यजमान श्रीलंकेचा संघ आयर्लंडविरुद्धच्या लढतीने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. हा सामना कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. 'ड' गटात न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानशिवाय दक्षिण आफ्रिका यांच्यात अव्वल दोन स्थानासाठी तगडी स्पर्धा असल्यामुळे हा डेथ ग्रुप मानला जात आहे. स्टार स्पोर्ट्सवर या लढतीचे थेट प्रेक्षपण करण्यात येणार असून जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइडवरही क्रिकेट चाहते या सामन्यांचा आनंद घेऊ शकतात.
Web Summary : T20 World Cup 2026 starts with NZ vs AFG. England faces Nepal, and Sri Lanka plays Ireland. Star Sports will broadcast matches; JioHotstar streams them.
Web Summary : टी20 विश्व कप 2026 की शुरुआत न्यूजीलैंड बनाम अफगानिस्तान से। इंग्लैंड का सामना नेपाल से और श्रीलंका का आयरलैंड से। स्टार स्पोर्ट्स पर मैचों का प्रसारण; जियोहॉटस्टार पर स्ट्रीमिंग।