Join us  

PAK vs NZ: पाकिस्तान दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; IPL मुळे शेजाऱ्यांची झाली फजिती 

Pakistan vs New Zealand: ट्वेंटी-२० मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 4:39 PM

Open in App

New Zealand Team For Pakistan Tour: न्यूझीलंडनेपाकिस्तान दौऱ्यासाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. येत्या जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटच्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश संघ ट्वेंटी-२० क्रिकेट खेळत आहेत. १८ एप्रिलपासून पाकिस्तानी संघ मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध पाच सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी किवी संघ जाहीर झाला असून आयपीएलमुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. न्यूझीलंडचे वरिष्ठ खेळाडू आयपीएलमध्ये व्यग्र असल्याने ते पाकिस्तान दौऱ्याला मुकतील.  

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अलीकडेच न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले असून सलामीचा सामना १८ एप्रिलला खेळवला जाईल. ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने दोन्हीही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानी संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता, जिथे शेजाऱ्यांना पाच सामन्यांच्या मालिकेत ४-१ असा दारूण पराभव स्वीकारावा लागला. शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वात प्रथमच पाकिस्तानने ट्वेंटी-२० मालिका खेळली. पण, आता शेजाऱ्यांचा संघ बाबर आझमच्या नेतृत्वात असणार आहे. 

आयपीएलमुळे न्यूझीलंडच्या संघातील वरिष्ठ खेळाडू पाकिस्तानविरूद्धच्या मालिकेला मुकणार आहेत. यामध्ये ट्रेन्ट बोल्ट, केन विल्यमसन, टीम साऊदी, डेव्हिड कॉन्वे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेनरी, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, विल यंग आणि टॉम लॅथम हे न्यूझीलंडच्या संघाचा भाग नाहीत. 

पाकिस्तान दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ -

मायकेल ब्रेसव्हेल (कर्णधार), फिन अलेन, मार्क चॅपमन, जोश क्लार्कसन, जॅकोब डफी, डिन फॉक्सक्रॉफ्ट, बेन लिस्टर, Cole McConchie, ॲडम मिल्ने, जिमी नीशम, Will O’Rourke, टीम रॉबिन्सन, बेन सर्स, टीम सेफर्ट, इश सोधी.  

PAK vs NZ ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक 

  1. १८ एप्रिल - रावळपिंडी
  2. २० एप्रिल - रावळपिंडी
  3. २१ एप्रिल - रावळपिंडी
  4. २५ एप्रिल - लाहोर 
  5. २७ एप्रिल - लाहोर 
टॅग्स :न्यूझीलंडपाकिस्तानबाबर आजमटी-20 क्रिकेटकेन विल्यमसनआयपीएल २०२४