Join us
Daily Top 2Weekly Top 5

Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...

इथं जाणून घेऊयात आतापर्यंतच्या कारकिर्दीत कितव्यांदा त्याच्यावर नर्व्हस नाइंटीची नामुष्की ओढावली त्यासंदर्भातील माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 21:20 IST

Open in App

Virat Kohli Nervous Nineties Record: न्यूझीलंडविरुद्धच्या वडोदराच्या स्टेडियमवर रंगलेल्या नव्या वर्षातील पहिल्या वनडे सामन्यात चेज मास्टर किंग कोहलीनं दमदार खेळीचा नजराणा पेश केला. सलग ऑस्ट्रेलियन मैदानातून सुरु झालेल्या फिफ्टी प्लसचा धमाका या सामन्यातही कायम राहिला. पण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ८५ व्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना तो झेल बाद झाला. नर्व्हस नाइंटीचा शिकार झाल्यानंतर कोहलीसह चाहत्यांच्या चेहऱ्यावरही निराशेचा भाव दिसून आला. दोन वर्षानंतर कोहलीवर ही वेळ आली. कमालीचा योगायोग म्हणजे याआधी तो न्यूझीलंडविरुद्धच नव्वदीच्या घरात बाद झाला होता. इथं जाणून घेऊयात आतापर्यंतच्या कारकिर्दीत कितव्यांदा त्याच्यावर नर्व्हस नाइंटीची नामुष्की ओढावली त्यासंदर्भातील माहिती 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातच आली होती ही वेळ!

न्यूझीलंडविरुद्धच्या वडोदराच्या मैदानातील वनडेत विराट कोहलीनं दमदार खेळी करताना ९१ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १०२.२० च्या स्ट्राईक रेटनं ९३ धावांची खेळी केली. जेमिसनच्या गोलंदाजीवर न्यूझीलंडचा कर्णधार मायकेल ब्रेसवल याने एक अप्रतिम झेल टिपत कोहलीच्या खेळीला ब्रेक लावला. याआधी २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तो १०४ चेंडूत ९५ धावा करून बाद झाला होता.  

Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवव्यांदा किंग कोहलीवर ओढावली नर्व्हस नाइंटीची नामुष्की

विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अगदी तोऱ्यात फलंदाजी करताना दिसला. सातत्य कायम राखत तो शतक सहज साजरे करेल, असे वाटत होते. पण या सामन्यात आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत नवव्यांदा त्याच्यावर नव्वदीच्या घरात बाद होण्याची वेळ आली.  

  • ९१ विरुद्ध बांगलादेश (२०१०)
  • ९४ विरुद्ध वेस्ट इंडिज (२०११)
  • ९९ विरुद्ध वेस्ट इंडिज (२०१३)
  • ९६ विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२०१३)
  • ९१ विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०१६)
  • ९२ विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०१७)
  • ९७ विरुद्ध इंग्लंड (२०१८)
  • ९५ विरुद्ध न्यूझीलंड (२०२३)
  • ९३ विरुद्ध न्यूझीलंड (२०२६)
English
हिंदी सारांश
Web Title : Kohli misses century again, falls in nervous nineties against New Zealand.

Web Summary : Virat Kohli missed his 85th international century, getting out for 93 against New Zealand. This is the ninth time he's fallen in the nervous nineties in his international career, repeating a similar dismissal against New Zealand last year.
टॅग्स :न्यूझीलंडचा भारत दौराभारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ