बेमातारा : रेल्वेच्या संघाने जोरदार कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राला नमवित छत्तीसगढ हौशी खो-खो संघटना आयोजित 53 व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटाचे जेतेपद मिळवले तर, महिला गटात एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडियाने बाजी मारली. अॅलन्स पब्लिक स्कूल ग्राऊंड येथे ही स्पर्धा पार पडली. पुरुष गटाच्या अंतिम सामन्यामध्ये चांगली चुरस ही पहायला मिळाली. गतविजेता महाराष्ट्र संघ व गेल्या वर्षीचा उपविजेता रेल्वे जेतेपदासाठी चांगले खेळताना दिसले. पण, रेल्वेला जेतेपद मिळवण्यात यश मिळाले. अवघ्या एका गुणाने महाराष्ट्राला पराभूत व्हावे लागले. रेल्वेच्या विजय हजारेने आक्रमण व बचाव दोन्ही ठिकाणी चमक दाखवली. त्याने दोन मिनिटाहून अधिक काळ बचाव करण्यासोबत 4 गड्यांना बाद केले. त्यामुळे रेल्वेने 15-14 असा विजय नोंदवला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- राष्ट्रीय खो-खो : महाराष्ट्राला पराभूत करत रेल्वेला जेतेपद
राष्ट्रीय खो-खो : महाराष्ट्राला पराभूत करत रेल्वेला जेतेपद
अवघ्या एका गुणाने महाराष्ट्र पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 22:10 IST
राष्ट्रीय खो-खो : महाराष्ट्राला पराभूत करत रेल्वेला जेतेपद
ठळक मुद्दे महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपविजेतेपदावर समाधानी