Join us  

Ravi Shastri : 'बिनधास्थ संघ' मिळाल्याचा अभिमान वाटतो, रवी शास्त्रींकडून विराट कोहली अँड कंपनीचं कौतुक

अनेक संकटांचा सामना करूनही भारतीय संघानं ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवला, इंग्लंडला आपल्या घरी लोळवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 12:49 PM

Open in App

अनेक संकटांचा सामना करूनही भारतीय संघानं ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवला, इंग्लंडला आपल्या घरी लोळवले. आयसीसीनं गुरुवारी जाहीर केलेल्या वार्षिक क्रमवारीत टीम इंडियानं कसोटी क्रिकेटमधील अव्वल स्थान कायम राखून इतिहास घडवला. सलग पाचव्या वर्षी टीम इंडिया कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर राहिली. भारतीय संघाच्या या यशाचं कौतुक करताना मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांनी एक ट्विट केलं.  Big News : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २० संघ खेळणार; आयसीसी मोठा निर्णय घेणार

''दृढनिश्चय आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर टीम इंडियानं कसोटीत अव्वल स्थान पटकावले. मोठ्या मेहनतीनं संघानं हा पल्ला गाठला. मध्यंतराला नियम बदलले, परंतु टीम इंडियानं प्रत्येक अडथळ्यावर मात केली. माझ्या मुलांनी आव्हानात्मक परिस्थितीत आव्हानात्मक क्रिकेट खेळले. या बिनधास्थ बंचचा अभिमान वाटतो,''असे शास्त्री यांनी लिहिले.  On This Day : 20 Six, 14 Fours; ९६ चेंडूंत कुटल्या गेल्या २२९ धावा; विराट कोहली- एबी डिव्हिलियर्सचा वर्ल्ड रिकॉर्ड!  

 आयसीसी कसोटी क्रमवारी: टीम इंडियाचे अव्वल स्थान कायम

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी संघांची वार्षिक क्रमवारी गुरुवारी जाहीर केली. त्यानुसार भारत मागच्यावर्षीसारखाच अव्वल स्थानावर कायम आहे. भारताचे १२१ गुण असून दुसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडचे १२० गुण आहेत. भारताने २४ कसोटी सामन्यांत २९१४ गुणांची कमाई केली आहे. न्यूझीलंडने १८ सामन्यांत दोन रेटिंग गुणांसह २१६६ गुणांची कमाई केली आहे. 

मागच्यावर्षी भारताने ऑस्ट्रेलियाला २-१ ने आणि त्यानंतर इंग्लंडला ३-१ ने पराभूत केले. न्यूझीलंडने वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानचा प्रत्येकी २-० ने पराभव केला होता. आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या क्रमवारीनुसार वार्षिक अपडेटचा २०१७-१८ च्या निकालाच्या जागी समावेश करण्यात येणार आहे. मे २०२० पासून झालेल्या सर्व सामन्यांसाठी शंभर, तर दोन वर्षांआधी झालेल्या सामन्यांसाठी ५० टक्के रेटिंग देण्यात आले आहे.

इंग्लंड १०९ रेटिंगसह तिसऱ्या, तर ऑस्ट्रेलिया एका गुणांनी मागे असल्यामुळे चौथ्या स्थानी आहे. पाकिस्तानचे ९४ गुण असून हा संघ पाचव्या तसेच ८४ गुण असलेला वेस्ट इंडिज संघ सहाव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका सातव्या आणि श्रीलंका आठव्या स्थानावर आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून साऊदम्पटन येथे विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळविला जाईल. 

टॅग्स :रवी शास्त्रीभारतीय क्रिकेट संघआयसीसी