On This Day : 20 Six, 14 Fours; ९६ चेंडूंत कुटल्या गेल्या २२९ धावा; विराट कोहली- एबी डिव्हिलियर्सचा वर्ल्ड रेकॉर्ड!  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 11:34 AM2021-05-14T11:34:01+5:302021-05-14T11:36:03+5:30

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) यांची ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये फटकेबाजी पाहणे, म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच.

On This Day: Virat Kohli & AB de Villiers Double Hundred Stand vs Gujarat Lions in 2016 | On This Day : 20 Six, 14 Fours; ९६ चेंडूंत कुटल्या गेल्या २२९ धावा; विराट कोहली- एबी डिव्हिलियर्सचा वर्ल्ड रेकॉर्ड!  

On This Day : 20 Six, 14 Fours; ९६ चेंडूंत कुटल्या गेल्या २२९ धावा; विराट कोहली- एबी डिव्हिलियर्सचा वर्ल्ड रेकॉर्ड!  

Next

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) यांची ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये फटकेबाजी पाहणे, म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL) रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( RCB) संघाकडून ही दोघ एकत्रच खेळतात आणि २०१६च्या आयपीएलमध्ये आजच्याच दिवशी या दोघांनी वर्ल्ड रिकॉर्ड खेळीची नोंद केली होती. त्यांनी ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये दुसऱ्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारीची नोंद केली होती. ट्वेंटी-२० क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली, परंतु २०१९मध्ये अफगाणिस्तानच्या हझरतउल्लाह जजाई व उस्मान गनी यांनी हा विक्रम तोडला. पण, ट्वेंटी-२०त आजही दुसऱ्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम विराट व एबीच्या नावावर आहे. Virat Kohli- Anushka Sharma : विराट-अनुष्का यांनी कोरोना लढ्यासाठी जमा केला रिकॉर्डतोड निधी; मानले सर्वांचे आभार!

२०१६च्या आयपीएलमध्ये गुजरात लायन्स (  Gujarat Lions ) संघाविरुद्धच्या सामन्यात या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९६ चेंडूंत २२९ धावा केल्या होत्या. विराट व एबीनं मैदानाच्या चौतर्फा तुफान फटकेबाजी केली होती. त्यांच्या या ऐतिहासिक खेळीत २० षटकार व १४ चौकारांचा समावेश आहे. RCBनं प्रथम फलंदाजी करताना ३ बाद २४८ धावा केल्या. ख्रिस गेल ६ धावा करून चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर माघारी परतला. त्यानंतर विराट व एबी यांनी दमदार खेळ केला. विराटनं ५५ चेंडूंत १०९ धावा केल्या. त्याच्या या खेळीत ५ चौकार व ८ षटकार आहेत. २०व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर विराटची विकेट पडली. दुसरीकडे एबीनं ५२ चेंडूंत १० चौकार व १२ षटकारांसह १२९ धावा चोपल्या. प्रत्युत्तरात गुजरात लायन्सचा संपूर्ण संघ १०४ धावांवर माघारी परतला अन् RCB नं १४४ धावांनी विजय मिळवला. इरफान-युसूफ पठाण यांना सलाम; कोरोना संकटात ९०,००० कुटुंबीयांचे भरले पोट अन् अजूनही मदतकार्य सुरूच


ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये दुसऱ्या विकेटसाठी सर्वाधिक २२९ धावांचा विक्रम विराट व एबीच्या नावावर आहे. अफगाणिस्तानच्या जजाई व गनी यांनी आयर्लंडविरुद्ध २०१९मध्ये पहिल्या विकेटसाठी २३६ धावांची भागीदारी केली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: On This Day: Virat Kohli & AB de Villiers Double Hundred Stand vs Gujarat Lions in 2016

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app