इरफान-युसूफ पठाण यांना सलाम; कोरोना संकटात ९०,००० कुटुंबीयांचे भरले पोट अन् अजूनही मदतकार्य सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 10:28 AM2021-05-14T10:28:56+5:302021-05-14T10:30:24+5:30

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं पुन्हा एकदा हातावर पोट असलेल्यांना हतबल केले आहे. त्यात पुन्हा एकदा इरफान व युसूफ हे पठाण बंधू मदतीला पुढे आले आहेत.

Irfan Pathan and Yusuf Pathan will be donating food and raw materials for families who are suffering due to COVID-19 crisis | इरफान-युसूफ पठाण यांना सलाम; कोरोना संकटात ९०,००० कुटुंबीयांचे भरले पोट अन् अजूनही मदतकार्य सुरूच

इरफान-युसूफ पठाण यांना सलाम; कोरोना संकटात ९०,००० कुटुंबीयांचे भरले पोट अन् अजूनही मदतकार्य सुरूच

Next

खरा माणून संकटात कळतो... कोरोना व्हायरसच्या संकटात आपल्यांनी नाकारले, परंतु अनेक जण मदतीलाही धावले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं पुन्हा एकदा हातावर पोट असलेल्यांना हतबल केले आहे. त्यात पुन्हा एकदा इरफान व युसूफ हे पठाण बंधू मदतीला पुढे आले आहेत. दक्षिण दिल्ली आणि वडोदरा येथील कोरोनाबाधित कुटुंबीयांना मोफत जेवण देण्याचं काम ते करत आहेत. मागच्या वर्षी या बंधूंनी जवळपास ९० हजार कुटुंबीयांच्या घरी रेशन पूरवण्याचं काम केलं आणि हे सर्व त्यांनी स्वखर्चातून करून दाखवले. क्रिकेटच्या मैदानावरील भावांची ही हिट जोडी मैदानाबाहेर सुपरहिट ठरली आहे. ( Irfan Pathan and Yusuf Pathan will be donating food and raw materials for families who are suffering due to COVID-19 crisis, earlier they have donated ration to 90,000 families.)  

इरफान व युसूप ही पठाण बंधूंची जोडी या काळात अनेकांसाठी खऱ्या अर्थानं संकटमोचक ठरली. मागील लॉकडाऊनमध्ये भरभरून मदत केल्यानंतर ही जोडी पुन्हा मदतीसाठी सक्रीय झाली आहे. वडोदरा पाठोपाठ आता ही जोडी दक्षिण दिल्लीत कोरोना बाधित व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत जेवण देण्याच काम करत आहेत. गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात गरजूंसाठी पठाण बंधूंनी 10 किलो तांदूळ आणि 700 किलो बटाटे दान करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय खेळाडूंचंही कोरोना लढ्यात मोठं योगदान; सचिन, विराट यांच्यासह अनेकांनी लावला हातभार!

शिवाय त्यांनी वडोदरा येथील विविध हॉस्पिटल्सनानं PPE किट्स व मास्कचे वाटपही केलं होतं. आता कोरोना संकट पुन्हा डोकं वर काढत असताना या दोघांनी वडिलांच्या नावानं सुरू असलेल्या Mehmoodkhan S Pathan Public Charitable Trustच्या माध्यमातून वडोदरा येथील कोरोना रुग्णांना मोफत अन्न पुरवण्याचे काम सुरू केले आहे. क्रिकेट अकादमी ऑफ पठाण्स ( Cricket Academy of Pathans ) च्या माध्यमातून दक्षिण दिल्लीतील कोरोना बाधितांना व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत जेवण देणार आहेत.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Irfan Pathan and Yusuf Pathan will be donating food and raw materials for families who are suffering due to COVID-19 crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app