Join us

'मुंबईकर' वर्ल्ड चॅम्पियन्स मुख्यमंत्र्यांच्या भेटीला! रोहित, सूर्या, दुबे, यशस्वी यांचा 'वर्षा'वर सत्कार

Rohit Sharma Team India at CM Eknath Shinde Varsha Bungalow: टी२० वर्ल्डकप जिंकणाऱ्या मुंबईतील चार खेळाडूंनी आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 16:08 IST

Open in App

Rohit Sharma Team India at CM Eknath Shinde Varsha Bungalow: कॅरेबियन बेटांवर रंगलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने फायनलच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. भारताने या विजयासह तब्बल १३ वर्षांनी वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय संघ वरचढ ठरला. १७ वर्षांनी पुन्हा एकदा टी२० विश्वचषकाची ट्रॉफी भारतात आली. भारतीय संघाने ही ट्रॉफी गुरुवारी मायदेशात आणली. दिल्लीत आल्यावर संघाचे खेळाडू आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. त्यानंतर संध्याकाळी मुंबईत विजय मिरवणुकीत सहभागी झाले. कालच्या जंगी सोहळ्यानंतर आज मुंबईकर खेळाडू असलेले कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चौघांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी सत्कार झाला.

'जगज्जेत्या' मुंबईकरांचा मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते सत्कार!

भारतीय संघात समावेश असलेले चार खेळाडू हे देशांतर्गत स्पर्धांमध्ये मुंबईच्या संघाकडून खेळतात. कर्णधार रोहित शर्मा, फलंदाज सूर्यकुमार यादव, अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे यांनी वर्ल्डकपमध्ये भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर युवा यशस्वी जैस्वाल याचाही संघात समावेश होता. या चार खेळाडूंनी आज दुपारी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत वर्ल्ड चॅम्पियन्सचा सत्कार करण्यात आला.  

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024एकनाथ शिंदेरोहित शर्मासूर्यकुमार अशोक यादवयशस्वी जैस्वाल