चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतले आहेत. सोमवारी मुंबईच्या विमानतळावर सर्वात आधी कॅप्टन रोहित शर्मा स्पॉट झाला. त्यानंतर आता मुंबई इंडियन्सच्या संघानं हार्दिक पांड्याच्या मायदेशातील एन्ट्रीची खास झलक दाखवलीये. मुंबई इंडियन्सच्या संघानं अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन खास कॅप्शनसह हार्दिक पांड्याच्या फोटोसह कडक एन्ट्रीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात हार्दिक पांड्याची कडक स्टाइल अन् त्याचा स्वॅग पाहायला मिळतोय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ आता चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जी जबादारी दिली ती पार पाडली
३१ वर्षीय हार्दिक पांड्याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही क्षेत्रात त्याने उपयुक्त कामगिरीसह आपल्यावरील जबादारी पार पाडली. भारतीय संघाने अतिरिक्त फिरकीपटूला संधी देण्यासाठी फक्त शमीच्या रुपात फक्त एकमेव प्रमुख जलदगती गोलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवलं. पांड्यावर दुसऱ्या जलदगती गोलंदाजाची उणीव भरून काढण्याची जबाबदारी पडली, ती त्याने पेलूनही दाखवली.
आता कॅप्टन्सीमध्ये 'मुंबई इंडियन्स'ला अच्छे दिन दाखवण्यासाठी तयार
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर हार्दिक पांड्या आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सज्ज झालाय. गत हंगामातही हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी करताना दिसले. पण १४ पैकी फक्त ४ सामन्यातच संघाला विजय मिळवता आला. रोहित शर्मा असताना त्याच्या खांद्यावर कॅप्टन्सीची जबाबदारी दिल्याचे अनेकांना खटकले. पण त्यानंतर टी-२० वर्ल्ड कप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यात कमालीचे बॉन्डिंग दिसून आले आहे. जे गत हंगामात घडलं ते विसरून मुंबईचा संघ यावेळी पुन्हा 'अच्छे दिन' दाखवून देण्यासाठी सज्ज असेल.