रोहित शर्मा , जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सोमवारी रात्रीच दाखल झाले, तर विराट कोहलीही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या बायो बबलमध्ये आला. २६ मार्चपासून IPL 2022 ला सुरूवात होणार आहे. मुंबई, नवी मुंबई व पुणे येथे साखळी फेरीचे सामने खेळवण्यात येणार आहेत. चेन्नई सुपर किंग्सचे दीपक चहर व ऋतुराज गायकवाड हे अद्याप दुखापतीतून सावरत आहे, त्यामुळे मेंद्रसिंग धोनीची चिंता वाढलीय. अशात आता Mumbai Indians ची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. मुंबईचा महत्त्वाचा व रोहित शर्माचा ( Rohit Sharma) खास खेळाडू सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) हा २७ मार्चला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत खेळणार नसल्याची शक्यता बळावली आहे.
मुंबई इंडियन्सने ताफ्यात रिटेन केलेल्या खेळाडूंपैकी सूर्यकुमार यादव हा एक आहे.  त्यामुळे तो मुंबईसाठी खूप महत्त्वाचा फलंदाज आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत दुखापत झाली होती आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली होती. ''सूर्यकुमार यादव सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरण्यासाठी गेला आहे. तो दुखापतीतून सावरत आहे, परंतु आयपीएल २०२२च्या पहिल्या सामन्याला खेळण्याची शक्यता फार कमी आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याला सलामीचा सामना खेळून दुखापतीबाबत उगाच धोका पत्करू नकोस, असा सल्ला देऊ शकते.''असे BCCIच्या सूत्रांनी PTIला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.   
२७ मार्चनंतर मुंबई इंडियन्स दुसरा सामना २ एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे. सूर्यकुमारला अंगठ्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी अतिरिक्त पाच दिवस मिळत आहेत. त्यामुळे तो दुसरा सामना नक्की खेळेल, असा विश्वास बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने व्यक्त केले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत सूर्यकुमार यादव सामनावीर ठरला होता.  आयपीएलमध्ये त्याने ११५ सामन्यांत २३४१ धावा केल्या आहेत आणि त्यात १३ अर्धशतकांचा समावेश आहे.
 
Mumbai Indians IPL 2022 Time Table 
 
- २७ मार्च - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
 - २ एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, डी वाय पाटील स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
 - ६ एप्रिल - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
 - ९ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
 - १३  एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
 - १६ एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध  लखनौ सुपर जायंट्स , ब्रेबॉर्न स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
 - २१ एप्रिल -  मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
 - २४ एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
 - ३० एप्रिल - राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
 - ६ मे - गुजरात टायट्सन विरुद्ध मुंबई इंडियन्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
 - ९ मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
 - १२ मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
 - १७ मे  - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
 - २१ मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून