IPL 2025 PBKS In Final: एक चूक नडली! कॅच सुटला तिथंच MI च्या हातून मॅचही निसटली (VIDEO)

जर तो कॅच झाला असता तर कदाचित मॅचचा रिझल्ट वेगळा लागू शकला असता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 03:23 IST2025-06-02T03:18:47+5:302025-06-02T03:23:45+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Mumbai Indians Owner Nita Ambani MI camp Left in Despair After Trent Boult Drops Nehal Wadhera Catch Turning Point Of Match PBKS vs MI IPL 2025 Qualifier Clash Watch | IPL 2025 PBKS In Final: एक चूक नडली! कॅच सुटला तिथंच MI च्या हातून मॅचही निसटली (VIDEO)

IPL 2025 PBKS In Final: एक चूक नडली! कॅच सुटला तिथंच MI च्या हातून मॅचही निसटली (VIDEO)

आयपीएलच्या १८ व्या हंगामातील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाने २०० पारची लढाई जिंकत अगदी दिमाखात फायनल गाठली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघासमोर मुंबई इंडियन्सवर आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच २०० धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरण्याची नामुष्की ओढावली. या पराभवासह संघाच्या सहाव्या अन् विक्रमी विजेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळाले. जसप्रीत बुमराहच्या पदरी आलले अपयशाशिवाय फलंदाजीवेळी एकानेही मोठी खेळी न केल्याचा फटका MI ला बसला. याशिवाय या मॅचचा टर्निंग पाइंट ठरला तो म्हणजे एक कॅच. जर तो कॅच झाला असता तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा असता. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

१० व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर कॅच सुटला अन्..

पंजाब किंग्जच्या डावातील १० व्या षटकात हार्दिक पांड्या गोलंदाजी करत होता. या षटकातील अखेरच्या चेंडूवर नेहल वढेराने फाइन लेगच्या दिशेनं फटका मारला. ट्रेंट बोल्टनं त्याचा कॅच सोडला अन् चेंडू सीमारेषेबाहेर गेला. हा कॅच सुटला त्यावेळी पंजाब किंग्जच्या धावफलकावर ३ बाद ९४ धावा होत्या. नेहल वढेरा फक्त १३ धावांवर खेळत होता. इथून पुढे त्याने कर्णधार श्रेयस अय्यरच्या साथीनं ६२ धावांची भागीदारी रचली. चौथ्या विकेट्सच्या या भागीदारीमुळे पंजाब किंग्जच्या संघाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली अन् शेवटी बाजीही मारली.

IPL मध्ये सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम! एबी डिव्हिलियर्सच्या विक्रम मोडीत काढत रचला नवा इतिहास

कॅच सुटल्यावर संघ मालकीण नीता अंबानींसह MI च्या ताफ्यात पसरली शांतता

नेहल वढेरा याने मैदानात उतरताच फटकेबाजीला सुरुवात केली होती. त्याचा सोपा झेल बोल्टनं सोडल्यावर याची मोठी किंमत मोजावी लागणार याची भीती MI च्या ताफ्यातही दिसून आली. MI फ्रँचायझीच्या संघ मालकीण नीता अंबानी या सुद्धा आपली निराशा लपवू शकल्या नाहीत. मैदानात गोलंदाजी करणारा कर्णधारासह MI च्या डगआउटमध्येही हा कॅच सुटल्याचा धोका जाणवला. शेवटी तेच झालं. श्रेयस अय्यरसोबत तगडी भागिदारी करत नेहल वढेरा छाप सोडून गेला अन् बोल्टनं सुटलेल्या कॅचसह MI नं मॅचसह विक्रमी ट्रॉफी जिंकण्याची संधीही गमावली. 

Web Title: Mumbai Indians Owner Nita Ambani MI camp Left in Despair After Trent Boult Drops Nehal Wadhera Catch Turning Point Of Match PBKS vs MI IPL 2025 Qualifier Clash Watch