Join us

Corona Virus: मुंबई इंडियन्सचा खेळाडू घरी परतला, पण पत्नीच्या 'त्या' मॅसेजेसनं उडवली झोप!

मुंबई इंडियन्स आणि न्यूझीलंडचा गोलंदाज मिचेल मॅक्लेघननं रविवारी पाकिस्तान सुपर लीग ( PSL) मधून मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला. पण, घरी परतल्यानंतर पत्नीनं ठेवलेल्या एका चिठ्ठीनं त्याला आश्चर्याचा धक्का बसला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 15:49 IST

Open in App

मुंबई इंडियन्स आणि न्यूझीलंडचा गोलंदाज मिचेल मॅक्लेघननं रविवारी पाकिस्तान सुपर लीग ( PSL) मधून मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मॅक्लेघननं पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडमध्येहीकोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भटकंतीस मनाई केली गेली आहे. त्यामुळे मायदेशात परतल्यानंतर मॅक्लेघननं स्वतःला सर्वांपासून ( self-isolation) दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि तो आता १४ दिवस घरातच राहणार आहे. पण, घरी परतल्यानंतर पत्नीनं ठेवलेल्या एका चिठ्ठीनं त्याला आश्चर्याचा धक्का बसला.

PSL मध्ये मॅक्लेघन कराची किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. मायदेशात परतल्यानंतर त्याला पत्नीनं लिहीलेली चिठ्ठी सापडली आणि त्यात तिनं लिहीलेला मॅसेज मॅक्लेघननं सोशल मीडियावर शेअर केला. या चिठ्ठीत तिनं लिहिलं की,''घराट एकटं राहुन तुझी चिडचिड होऊ लागल्यास, एक गोष्ट आठव.... ती म्हणजे तू त्या घरात पत्नीसोबत बंदिस्त नाहीस आणि ही तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. लव्ह यू.'' 

मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज मॅक्लेघनने नुकतेच प्रेयसी जॉर्जिया इंग्लंड हिच्याशी विवाह केला. दोघेही बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते आणि अखेरीस त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल स्पर्धेदरम्यान मॅक्लेघनला चिअर करण्यासाठी जॉर्जिया भारतात अनेकदा आली होती. मॅक्लेघनने मुंबई इंडियन्सच्या जेतेपदाच्या वाटचालीत अनेकदा महत्त्वाची भूमिका वटवली आहे. 33 वर्षीय मॅक्लेघनने 48 वन डे आणि 29 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत किवी संघाचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे 82 व 30 विकेट्स घेतल्या आहेत. 

2016 मध्ये न्यूझीलंडकडून अखेरचा सामना खेळला आहे. त्याने 2015, 2017 आणि 2019 च्या मुंबई इंडियन्सच्या जेतेपदात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. आयपीएलमध्ये त्याने 56 सामन्यांत 71 विकेट्स घेतल्या आहेत. 21 धावांत 4 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

ग्लेन मॅक्सवेल होणार भारताचा जावई; पाहा त्याच्या देशी साखरपुड्याचे फोटो!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं लग्नात केली एक चूक, होऊ शकतो तीन वर्षांचा कारावास

Fact Check : खरंच रोनाल्डोनं कोरोनाग्रस्तांसाठी हॉटेल्सचे रुपांतर हॉस्पिटलमध्ये केले का?

Corona Virus मुळे भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद जर्मनीत अडकला

MS Dhoniनं दिलेल्या 'सर' या उपाधीचा रवींद्र जडेजाला राग येतोय... जाणून घ्या कारण

#OnThisDay in 2012: सचिन तेंडुलकरनं आजच्याच दिवशी ठोकलं होतं 'महा'शतक!

Coronavirus : रोहित शर्मानं मानले डॉक्टर व नर्सचे मनापासून आभार; पण कशासाठी?

Corona Virusच्या आडून काश्मीर मुद्द्यावर शोएब अख्तरची वादग्रस्त पोस्ट, नेटिझन्सनी धरलं धारेवर 

 

टॅग्स :कोरोनान्यूझीलंडपाकिस्तानमुंबई इंडियन्स