Join us

Suryakumar Yadav, IPL 2022 MI vs PBKS Live: Mumbai Indians ला पराभवाचा जोरदार 'पंच'; पंजाबचा १२ धावांनी विजय

मुंबईचा यंदाच्या हंगामात पाचही सामन्यात पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 23:37 IST

Open in App

Suryakumar Yadav, IPL 2022 MI vs PBKS Live: पंजाब किंग्ज विरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा  धावांनी पराभव झाला. मुंबई इंडियन्सचा यंदाच्या हंगामातील हा सलग पाचवा पराभव ठरला. प्रथम फलंदाजी करताना शिखर धवन (७०) आणि मयंक अग्रवाल (५२) या दोघांनी पंजाबला १९८ धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात बेबी एबी (४९), सूर्यकुमार यादव (४३) आणि तिलक वर्मा (३६) यांनी झुंज दिली. पण अखेर मुंबईला हंगामातील पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले.

प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या सलामीवीरांनी मुंबईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. कर्णधार मयंक अग्रवाल आणि शिखर धवन दोघांनीही अर्धशतके ठोकली. मात्र शतकी सलामी देण्यास त्यांची जोडी ३ धावांनी कमी पडली. मयंक अग्रवाल ३२ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५२ धावा करून बाद झाला. पाठोपाठ जॉनी बेअरस्टो १२, लियम लिव्हिंगस्टोन २ धावा काढून माघारी परतला. शिखर धवनने मात्र ५० चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ६० धावांची शानदार खेळी केली. याशिवाय शेवटच्या टप्प्यात जितेश शर्माने (३०*) फटकेबाजी करत पंजाबला मोठी धावसंख्या उभारून दिली.

१९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने दमदार सुरूवात केली होती. पण १७ चेंडूत २८ धावा काढून तो बाद झाला. इशान किशनही ३ धावांवर बाद झाला. त्यानंतर डेवाल्ड ब्रेविसने ४९ धावांची खेळी केली. त्याचे अर्धशतक एका धावेने हुकले. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यांनी दमदार फलंदाजी केली होती. पण तिलक वर्मा (३६) गोंधळामुळे धावचीत झाला. पाठोपाठ पोलार्डही (९) गोंधळामुळे धावचीत झाला. सुर्याने सामना जिंकण्याचा प्रयत्न केला, पण तो ४३ धावांवर माघारी परतला. त्यानंतर मात्र मुंबईला १८६ धावांपर्यंतच मजल मारता आली.

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्ससूर्यकुमार अशोक यादवकिरॉन पोलार्ड
Open in App