Marco Jansen 3 Wickets in 1 Over, IPL: Mumbai Indians चा माजी गोलंदाज SRHकडून खेळताना चमकला; पहिल्याच षटकात घेतले ३ बळी

त्याने एकाच षटकात विराट, फाफ डू प्लेसिस अन् रावतला धाडलं माघारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 08:48 PM2022-04-23T20:48:29+5:302022-04-23T21:02:09+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Indians former bowler marco jansen takes 3 wickets in his first over Virat Kohli Faf Du Plessis IPL 2022 SRH vs RCB | Marco Jansen 3 Wickets in 1 Over, IPL: Mumbai Indians चा माजी गोलंदाज SRHकडून खेळताना चमकला; पहिल्याच षटकात घेतले ३ बळी

Marco Jansen 3 Wickets in 1 Over, IPL: Mumbai Indians चा माजी गोलंदाज SRHकडून खेळताना चमकला; पहिल्याच षटकात घेतले ३ बळी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Marco Jansen 3 Wickets in 1 Over, IPL 2022 SRH vs RCB Live: IPL हा केवळ फलंदाजांचा खेळ आहे, असा समज सुरूवातीच्या काही हंगामांमध्ये प्रेक्षक आणि क्रिकेटरसिकांचा झाला होता. पण गेल्या काही सीझनमध्ये गोलंदाजांनाही चांगले महत्त्व आले. उमरान मलिक सारख्या नवख्या गोलंदाजाने SRH कडून खेळताना २०व्या षटकात एकही धाव न देता ३ बळी टिपण्याचा कारनामा नुकताच एका सामन्यात केला. त्याच्याच संघातील गोलंदाज आणि आधी  Mumbai Indians कडून खेळणार मार्को जेन्सन याने त्याच्याइतकीच दमदार कामगिरी केली.

पहिली विकेट- (फाफ डू प्लेसिस)

दुसरी विकेट- (विराट कोहली)

तिसरी विकेट- (अनुज रावत)

मार्को जेन्सनने RCBच्या डावाची दुसरी आणि आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने पहिल्या चेंडूवर कर्णधार फाफ डू प्लेसिस ला ५ धावांवर बाद केलं. त्यानंतर पहिल्याच चेंडूवर विराटही बाद झाला. दोन गडी बाद झाल्यानंतर जेन्सनने पुन्हा एक विकेट षटकाच्या शेवटच्या चेंडूवर काढली. अनुज रावतला त्याने एडन मार्करमच्या करवी झेलबाद केले. त्यामुळे RCBची अवस्था ३ बाद ८ धावा अशी झाली होती.

RCBच्या धक्क्यातून सावरूच शकली नाही. त्यांचे भरवशाचे फलंदाज ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद सुयश प्रभुदेसाई हेदेखील झटपट बाद झाले.

Web Title: Mumbai Indians former bowler marco jansen takes 3 wickets in his first over Virat Kohli Faf Du Plessis IPL 2022 SRH vs RCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.