इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामाची क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे. २८ मार्चला IPL स्पर्धेचा बिगूल वाजणार असून दुसऱ्या दिवशीच या स्पर्धेतील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय मुंबई इंडियन्स संघ मैदानात उतरेल. २९ मार्चला KKR विरुद्ध मुंबईतील वानखेडेच्या घरच्या मैदानातून MI संघ यंदाच्या हंगामातील मोहिमेची सुरुवात करेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहित शर्मा फक्त फलंदाजी करणार?
यंदाच्या हंगामात रोहित शर्माची भूमिका काय असेल? तो फक्त फलंदाजीच करणार का? अर्थात त्याचा वापर इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपातच करण्यात येणार का? हा मुद्दा चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. यासंदर्भात मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महिला जयवर्धने यांनी संघ व्यवस्थापनाची भूमिका एकदम स्पष्टपणे सांगितली आहे.
हिटमॅन रोहित शर्माची उत्तुंग फटकेबाजी; MI च्या सराव सत्रातील व्हिडिओ व्हायरल
MI च्या मुख्य प्रशिक्षकांनी गेम प्लॅनच सांगून टाकला
एमआय ज्युनियर २०२६ च्या अंतिम सामन्यादरम्यान रोहितबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयवर्धने म्हणाले की, रोहितने स्वतःची फिटनेस उत्तम पद्धतीने सांभाळली आहे. तो आता पूर्वीपेक्षा अधिक तंदुरुस्त दिसतोय. गेल्या आठवड्यात रोहित शर्मा संघाला जॉईन झाला असून तो नेट्समध्ये उत्तमरित्या फटकेबाजी करत आहे. आयपीएल २०२६ च्या हंगामात त्याचा वापर योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. त्याचा अजूनही कायम आहे. त्यामुळे रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात नव्हे तर शक्य तितका वेळ मैदानावर ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असा गेम प्लॅनचा जयवर्धने यांनी सांगून टाकला.
याआधी जे झालं ते विसरा
मागील हंगामात रोहित शर्मा हा बऱ्याच सामन्यात इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात खेळताना दिसला होता. यासंदर्भात MI कोच म्हणाले की, दुखापतीमुळे त्याचा जपून वापर केला होता. मात्र यावेळी तशी परिस्थिती नाही, असेही जयवर्धने यांनी सांगितले. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून एखादा गोलंदाज आणायचा निर्णय घेतल्यास कोणत्या खेळाडूला बाहेर ठेवायचे, याचा नीट विचार करावा लागतो. संघात बहुतेक खेळाडू अष्टपैलू असल्याने सध्या केवळ रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हेच पूर्णवेळ फलंदाज आहेत, हे देखील त्यांनी सांगितले.
सूर्या यांच्या फॉर्मबाबतही प्रतिक्रिया
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. पण त्याची फलंदाजी ही चिंतेचा विषय आहे. यासंदर्भातही जयवर्धने म्हणाले की, त्यांच्या फॉर्मबाबत आम्ही फार चिंतित नाही. ते दर्जेदार खेळाडू आहे आणि गरजेच्या वेळी तो संघाच्या मदतीला धावून येतो. सातत्य महत्त्वाचे आहे आणि त्यावर सूर्या नक्कीच काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Web Summary : Mumbai Indians coach Mahela Jayawardene reveals Rohit Sharma will primarily bat in IPL 2026. The team aims to maximize his time on the field, moving away from using him as just an Impact Player. Concerns about Suryakumar Yadav's form are dismissed; the team trusts his abilities.
Web Summary : मुंबई इंडियंस के कोच महेला जयवर्धने ने खुलासा किया कि रोहित शर्मा आईपीएल 2026 में मुख्य रूप से बल्लेबाजी करेंगे। टीम का लक्ष्य मैदान पर उनका समय बढ़ाना है, न कि सिर्फ एक इम्पैक्ट प्लेयर के रूप में उनका उपयोग करना। सूर्यकुमार यादव के फॉर्म को लेकर चिंताएं खारिज की गईं; टीम को उनकी क्षमताओं पर भरोसा है।