Join us

Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2022: रोहितचं एक ट्वीट अन् मुंबई इंडियन्सचे चाहते प्रचंड संतापले.. पाहा काय आहे प्रकरण

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने गमावले आठच्या आठ सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 20:09 IST

Open in App

Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2022: मुंबई इंडियन्स संघाचा यंदाचा हंगाम अतिशय वाईट सुरू आहे. मुंबईच्या संघाने पहिले आठच्या आठ सामने गमावले. त्यामुळे मुंबईचा प्ले ऑफचा मार्ग जवळपास बंद झाला आहे. मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या IPL मधील असा एकमेव संघ आहे ज्याने आतापर्यंत एकही विजय मिळवलेला नाही. गेली सात-आठ वर्षे मुंबईच्या संघाची घडी बसली होती. पण आता नव्या संघाला सोबत घेऊन पुढे जाण्याचे आव्हान रोहितसमोर आहे. अद्याप हे आव्हान रोहितला पेलवलेले नाही. दरम्यान, एका ट्वीटमुळे रोहितवर चाहते प्रचंड संतापल्याचे दिसून आले.

'मुंबई इंडियन्स'च्या संघात इतके वर्षे क्विंटन डी कॉक, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, लसिथ मलिंगा, ट्रेंट बोल्ट अशी काही मोठं नावं होती. पण हे सर्व खेळाडू मुंबईने करारमुक्त केले. त्यामुळे नव्या खेळाडूंची एकत्रित मोट बांधण्याचा प्रयत्न मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्मा करत आहे. याच दरम्यान रोहित शर्माने एका फुटबॉल संघाला चीअर करणारे ट्वीट टाकले. त्याचे हे ट्वीट चाहत्यांना रूचले नाही. त्यामुळे चाहते त्याच्यावर प्रचंड संतापले.

चाहत्याचा संताप, पाहा निवडक ट्वीट्स-

--

--

--

--

रोहितने केलेल्या ट्वीटवर युजर्सचा प्रचंड संताप झाला. अनेकांनी रोहितला ट्रोल केलं. एका युजरने लिहिले की, स्वत:ला एकही सामना जिंकता येत नाहीये पण दुसऱ्यांना चीअर करतोस. दुसऱ्या एका युजरने लिहिलं की आता रियल माद्रिदचं काही खरं नाहीये. आता तेदेखील हारणार. अशा अनेक कमेंट्स रोहितच्या ट्वीटवर दिसून आल्या.

टॅग्स :आयपीएल २०२२रोहित शर्मामुंबई इंडियन्सट्विटर
Open in App