Video: Baby AB ची 'हवाई कमाल'! सीमारेषेवर झेप घेत डेवाल्ड ब्रेव्हिसने पकडला भन्नाट कॅच

Baby AB Dewald Brevis catch Video, SAT20 : चेंडू वेगाने षटकाराच्या दिशेने जात असताना त्याने हवेत उडी मारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:14 IST2025-01-30T16:02:37+5:302025-01-30T16:14:45+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Indians Capetown Baby AB Dewald Brevis takes superb catch on boundary line vs SRH Cape in SAT20 viral video | Video: Baby AB ची 'हवाई कमाल'! सीमारेषेवर झेप घेत डेवाल्ड ब्रेव्हिसने पकडला भन्नाट कॅच

Video: Baby AB ची 'हवाई कमाल'! सीमारेषेवर झेप घेत डेवाल्ड ब्रेव्हिसने पकडला भन्नाट कॅच

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Baby AB Dewald Brevis catch Video, SAT20 : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या SAT20 लीग स्पर्धेत बुधवारी मुंबई इंडियन्स केपटाऊन ( Mumbai Indians Capetown) आणि सनरायजर्स इस्टर्न केप यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनरायजर्स संघाने १९.२ षटकात १०७ धावा केल्या. सलामीवीर बेडिंघमच्या ४५ धावा वगळता इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. या आव्हानाचा पाठलाग करताना एमआय संघाने १० गडी राखून ११ षटकांत सामना जिंकला. रायन रिकल्टनच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर एमआयने हा विजय साकारला. या सामन्यात एमआय संघाकडून खेळणाऱ्या बेबी एबी म्हणजेच डेवाल्ड ब्रेव्हिसच्या कॅचची चांगलीच चर्चा रंगली.

सनरायजर्स संघाची सुरुवात खराब झाली होती. १३ धावांवर पहिला बळी गेल्यानंतर अबेल खेळायला आला. त्याला फारशी चमक दाखवणे जमले नाही. पहिल्या चेंडूवर त्याने एकेरी धाव घेतली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्यासाठी त्याने चेंडू हवेत मारला आणि तेथेच तो फसला. अबेलने मारलेला फटका तोकडा पडला. डेवाल्ड ब्रेव्हिस सीमारेषेवर उभा होता. त्याने हवेत उडी मारत अप्रतिम झेल टिपला आणि संघाला आणखी एक विकेट मिळवून दिली.

दरम्यान, सामन्यात एमआय संघाने प्रथम गोलंदाजी केली. त्यांच्या गोलंदाजांनी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली. सनराजयर्स संघाचा टोनी डी झॉर्जी (२), अबेल (१), एडन मार्करम (१०), ट्रिस्टन स्टब्स (५), मार्को यान्सेन (७) हे झटपट बाद झाले. सिमेलेन आणि बेडिंगहम यांच्यात चांगली भागीदारी झाली. पण नंतर बेडिंगहमला ४५ धावांवर तर सीमेलेनला २१ धावांवर माघारी परतावे लागले. त्यानंतर संघाची शेपूट झटपट गुंडाळत एमआयने त्यांना १०७ धावांवर रोखले. या आव्हानाचा पाठलाग करताना अवघ्या ११ षटकांत एमआयने विजय मिळवला. सलामीवीर रासी वॅनडर डुसेन याने ४८ धावा केल्या. तर रायन रिकल्टनने ३६ चेंडूत ५९ धावा केल्या. 

Web Title: Mumbai Indians Capetown Baby AB Dewald Brevis takes superb catch on boundary line vs SRH Cape in SAT20 viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.