Join us

Vinod Kambli News विनोद कांबळीची अवस्था वाईट, चालताही येईना... लोकांचा घ्यावा लागला आधार, Viral Video त दावा

Vinod Kambli Viral Video: सचिन तेंडुलकरचा मित्र आणि क्रिकेट पार्टनर असलेला विनोद कांबळी काही काळापासून आर्थिक अडचणींचा सामना करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 13:30 IST

Open in App

Vinod Kambli Viral Video: मुंबई आणि क्रिकेट हे नातं खूप जुनं आहे. मुंबईने भारताला सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, अंशुमान गायकवाड यांच्यासारखे प्रतिभावान खेळाडू दिले. त्याच्या पुढच्या पिढीत भारताला मुंबईतूनच सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे दोन खेळाडू मिळाले. सचिनने २४ वर्षांची समृद्ध क्रिकेट कारकीर्द घडवली. पण विनोद कांबळीला क्रिकेटविश्वात फार काळ तग धरता आला नाही. काही वैयक्तिक कारणांमुळे तो क्रिकेटपासून दूर केला. गेल्या काही काळापासून तो आर्थिक समस्यांशी झुंजत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. तशातच आता एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओतील व्यक्ती विनोद कांबळी असल्याचा दावा युजर्सकडून केला जात आहे.

एकेकाळी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी ही जोडी सरस मानली जात होती. विनोद कांबळीने मैदानावर धावा करताना दमदार कामगिरी केली. पण नुकताच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसणार व्यक्ती विनोद कांबळी असल्याचे बोलले जात आहे. व्हिडीओत दिसत असल्यानुसार, त्याला नीट चालताही येत नाहीये. व्हायरल व्हिडीओ पाहून काही जण विनोद कांबळी दारूच्या नशेत असल्याचे म्हणताना दिसतायत तर काही जण तो आजारापणाने खंगला असल्याचा दावा करत आहेत. पाहा व्हिडीओ-

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विनोद कांबळी बाईकजवळ उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. तो तिथे काही सेकंद उभा राहतो. मग अचानक तो भांबावतो. त्यानंतर तिथे उभे असलेले लोक त्याला आधार देतात आणि दोन व्यक्तींच्या मदतीच्या सहाय्याने विनोद कांबळी पुढे येतो. कांबळीच्या व्हिडिओवर शेकडो कमेंट्स आल्या आहेत. परंतु हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याने, त्यात कितपत तथ्य आहे हे सांगता येणे शक्य नाही. लोकमत या व्हिडीओ पुष्टी करत नाही.

टॅग्स :विनोद कांबळीमुंबईसामाजिकसोशल मीडिया