MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)

MS धोनीसंदर्भात नेमकं काय म्हणाले रवी शास्त्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 17:43 IST2025-06-10T17:40:10+5:302025-06-10T17:43:43+5:30

whatsapp join usJoin us
MS Dhonis Hands Are Faster Than A Pickpocket Ravi Shastri Makes A Bold Statement On Former Indian Captain | MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)

MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी महेंद्रसिंह धोनीसंदर्भात केलेले एक वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे.  शास्त्री हे आपल्या खास अन् बिनधास्त अंदाजातील 'बोलंदाजी'मुंळे नेहमीच चर्चेत असतात. एका खास शोमध्ये धोनीसंदर्भात व्यक्त होताना त्यांना थेट पाकीटमार आठवल्याचे पाहायला मिळाले. धोनीविषयी बोलताना त्यांनी 'पाकीटमार' असा उल्लेख का केला?  शास्त्री नेमकं काय म्हणाले? जाणून घेऊयात सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

MS धोनीसंदर्भात नेमकं काय म्हणाले रवी शास्त्री?

आयसीसी इवेंटच्या खास कार्यक्रमावेळी रवी शास्त्री यांनी धोनीच्या विकेटमागील चपळ यष्टीरक्षणासंदर्भात  पाकीटमारचा दाखला दिल्याचे पाहायला मिळाले. धोनीचे हात हे एखाद्या पाकीटमारापेक्षाही जलद आहेत. भारतात असाल अन् खास करून ते मैदानात अहमदाबादचे असेल तर धोनी विकेटमागे असू नये अशीच इच्छा कोणाचीही असेल. तो विकेट मागे असणं म्हणजे मागे बघण्याआधी बटवा 'गायब' अशीच काहीशी परिस्थिती होईल, अशा आशयाच्या शब्दांत शास्त्रींनी धोनीच्या विकेटमागील चपळाईचं कौतुक केले आहे.  धोनीचं आपल्या भावनांवर कमालीचे नियंत्रण असल्याचा किस्सा शेअर करताना शास्त्री म्हणाले आहेत की, तो शून्यावर बाद झालेला असो किंवा त्याने वर्ल्ड कप जिंकून दिलेला क्षण असो त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलत नाही.

Video: ऋषभ पंतने फोडलं लॉर्ड्स स्टेडियमचं छत; गुडघ्यावर बसून ठोकला धडाकेबाज षटकार

आता धोनीही ICC हॉल ऑफ फेममध्ये झालाय सामील 

क्रिकेट जगतातील बहुमूल्य योगदानासाठी आयसीसीकडून देण्यात येणाऱ्या आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये नुकतेच धोनीच्या नावाचाही समावेश झाला आहे. धोनी खास क्लबमध्ये सामील होणारा ११ वा भारतीय खेळाडू ठरला आहे. धोनीशिवाय दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला आणि ग्रीम स्मिथ, ऑस्ट्रेलियन मॅथ्यू हेडन, न्यूझीलंडचा डॅनियल व्हेट्टोरी यांच्यासह पाकिस्तानची माजी महिला क्रिकेटर सना मीर आणि इंग्लंडची सारा टेलर यांची नावे आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट कण्यात आली आहेत.

एमएस धोनीची कामगिरी

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाळी भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कप, वनडे वर्ल्ड कप, आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती. भारताकडून धोनी ९० कसोटी,  ३५० वनडे आणि ९८ टी-२० सामने खेळला आहे. कसोटीत त्याच्या खात्यात ४८७६ धावा, वनडेत १०७७३ धावा आणि आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये त्याने १६१७ धावा केल्या आहेत. 

Web Title: MS Dhonis Hands Are Faster Than A Pickpocket Ravi Shastri Makes A Bold Statement On Former Indian Captain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.