T20 World Cup 2026: टीम इंडिया खतरनाकच! पण कधी कधी… MS धोनीने ‘या’ गोष्टीबद्दल व्यक्त केली चिंता

MS Dhoni on Team India T20 World Cup 2026: वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडिया भारी असली तरी कधीही धोक्याची घंटा वाजू शकते, असे धोनी नेमकं का म्हणाला? जाणून घेऊयात सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 13:43 IST2026-02-04T13:41:27+5:302026-02-04T13:43:04+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
MS Dhoni Shared Which Team Will Be India Biggest Threat In T20 World Cup 2026 | T20 World Cup 2026: टीम इंडिया खतरनाकच! पण कधी कधी… MS धोनीने ‘या’ गोष्टीबद्दल व्यक्त केली चिंता

T20 World Cup 2026: टीम इंडिया खतरनाकच! पण कधी कधी… MS धोनीने ‘या’ गोष्टीबद्दल व्यक्त केली चिंता

T20 World Cup 2026 MS Dhoni On Team India Biggest Threat : टी २० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय संघ सर्वात मजबूत दावेदारांपैकी एक आहे. भारतीय संघ छोट्या प्रारुपात सातत्याने दमदार कामगिरी करताना पाहायला मिळाले आहे. संतुलित फलंदाजी, घातक गोलंदाजी आणि अनुभवाने परिपूर्ण असलेला संघ यंदाच्या हंगामात घरच्या मैदानात इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

टी-२० वर्ल्ड कपच्या आतापर्यंतच्या इतिहासात कोणत्याही संघाने जेतेपदाचा बचाव केलेला नाही. गत चॅम्पियन टीम इंडिया या कामगिरीसह घरच्या मैदानात जेतेपद मिळवणारी पहिली टीम ठरू शकते. यंदाच्या हंगामात टीम इंडिया धुरंधर ठरेल, असेच मत भारतीय संघाला पहिली वहिली टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारा कर्णधार MS धोनीलाही वाटते. पण यावेळी त्याने एका गोष्टीची चिंताही व्यक्त केली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडिया भारी असली तरी कधीही धोक्याची घंटा वाजू शकते, असे धोनी नेमकं का म्हणाला? जाणून घेऊयात सविस्तर

IPL 2026: विराट कोहलीच्या RCBची जर्सी बदलली; नव्या लूकमध्ये दिसणार 'हा' महत्त्वाचा बदल

टीम इंडिया सगळ्यात डेंजर

क्रिकेट विश्लेषक आणि समालोचक जतिन सप्रू याने घेतलेल्या खास मुलाखतीमध्ये महेंद्रसिंह धोनीने आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला तोड नाही, असे म्हटले आहे. टीम इंडियाबद्दल काय वाटते? या प्रश्नाच उत्तर देताना धोनीनं ही टीम सगळ्यात डेंजर आहे. अशी पहिली प्रतिक्रिया दिली. पुढे तो म्हणाला की, "टी20 फॉरमॅटमध्ये अनुभव खूप महत्त्वाचा असतो आणि या बाबतीत भारत खूप पुढे आहे. परिस्थिती सामान्य राहिली, तर टीम इंडियाला हरवणं सोपं नाही."

MS धोनीनं व्यक्त केली या गोष्टीची चिंता, म्हणाला...


महेंद्र सिंह धोनी टीम इंडियाची क्षमता अद्भत असल्याचे सांगितले. पण यावेळी त्याने दव फॅक्टर धोकादाय ठरू शकतो, असा उल्लेखही केला. आपल्या कारकिर्दीत याच गोष्टीची सर्वात भीती वाटायची, असेही त्याने यावेळी कबुल केले. दव पडल्यामुळे  अनेक गोष्टी बदलतात. रात्रीच्या वेळी होणाऱ्या सामन्यात नाणेफेकीचा  कौल महत्त्वाचा ठरतो. जर दव फॅक्टर नसेल, परिस्थितीत सामन्य असेल तर १० पैकी बहुतेक सामने भारतीय संघच जिंकेल. असे धोनी म्हणाला आहे.

टी २० क्रिकेटमधील अनिश्चिततेवरही केलं भाष्य

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. त्या टी-२० क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा अंदाज बांधणे कठीण असते. यावरही धोनीनं मत मांडले आहे. टी २० क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूचा खराब दिवस आणि प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूचा चांगला दिवस सामन्याला कलाटणी देणारा ठरू शकतो. लीग किंवा नॉकआउट टप्प्यात कधी-कधी रणनीतीपेक्षा नशिबाचा प्रभाव जास्त असतो. अशा वेळी सर्वात महत्त्वाचं असतं की, कोणताही खेळाडू दुखापतग्रस्त होऊ नये. प्रत्येकाने आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडण्याची ही वेळ असते, असेही तो म्हणाला आहे.

Web Title : टी20 विश्व कप: एमएस धोनी ने टीम इंडिया के खतरे पर चिंता व्यक्त की।

Web Summary : एमएस धोनी का मानना ​​है कि टीम इंडिया एक मजबूत टी20 विश्व कप दावेदार है। उन्होंने ओस कारक के बारे में चिंता व्यक्त की, जो विशेष रूप से रात में होने वाले खेलों को महत्वपूर्ण रूप से प्रभावित कर सकता है। उन्होंने टी20 क्रिकेट की अप्रत्याशितता पर भी प्रकाश डाला।

Web Title : T20 World Cup: MS Dhoni expresses concern about Team India's threat.

Web Summary : MS Dhoni believes Team India is a strong T20 World Cup contender with a balanced team. He expressed concern about the dew factor, which can significantly impact games, especially those at night. He also highlighted the unpredictability of T20 cricket, where luck and individual performances matter.