ठाणे - धोनीला दोनदा स्वाक्षरी घेण्याच्या निमिताने जवळून पाहिले. त्यावेळी तो नेट प्रक्टिस करत होता. एकदा 2006-07 रोजी आणि दुसरी 2009-10 या दोन्ही वर्षी त्याची सही घेण्याचा योग आला. अत्यंत साधा आणि जमिनीवर पाय असणारा क्रिकेटपटू आहे असे त्यावेळी जाणवले. धोनी हा खेळाडू म्हणून कसा आहे ह्याचा अंदाज घेण्यासाठी मी त्याचा स्वाक्षरीचा अभ्यास आधीही केला होता आणि आजही करत आहे अशा भावना ठाण्यातील प्रसिद्ध सह्याजीराव सतीश चाफेकर यांनी व्यक्त केल्या.
महेंद्रसिंग धोनी याने शनिवारी निवृत्ती जाहीर केली आणि सोशल मीडियावर त्याच्या निवृत्तीबाबत नाराजी व्यक्त केली जाऊ लागली. या कॅप्टन कुलची स्वाक्षरी घेणाऱ्या चाफेकर यांनी सही घेताना त्यावेळच्या आठवणी आणि त्याच्या स्वाक्षरीवरून धोनीची स्वभाव वैशिष्ट्य सांगितली. ते म्हणाले, धोनी हा कधीही खेळाडूंना किंवा इतरांनाही न दुखावणारा व्यक्ती, तसेच सातत्य राखणारा खेळाडू असल्याचे त्याची स्वाक्षरी सांगते. तसेच, त्याच्या स्वाक्षरींचे अप्स उंच आहेत. ज्याचे अप्स उंच ती व्यक्ती कर्तृत्वान असते. तो फक्त ' माही ' अशी स्वाक्षरी करतो.
दुर्दैवाने मला त्याची पूर्ण स्वाक्षरी मिळाली नाही म्हणून याच अक्षरावरून मी सांगत आहे. तसाच तो प्रोफेशनल आहे त्याला आपण कॅप्टन कुल म्हणतो, अर्थात तो बाहेरून तसा दिसत असला तरी अंतर्मनातून तो तसा नाही. तो सतत अनेक अंगाने विचार करतो. तो निर्णय पटकन घेतॊ, ती क्षमता त्याच्यात निश्चित आहे. त्याच्या स्वाक्षरीच्या ' आय ' या अक्षराने अनेक गोष्टी समजून आल्या. तो पटकन कधी कधी एकदम स्वतःला सोडून देतो आणि आणि परत सावरतो. धोनी स्वाक्षरी करताना अत्यंत काटेकोरपणे करतो असे निरीक्षण चाफेकर नोंदविले.