Join us  

MS Dhoni Retirement: महेंद्रसिंग धोनीच्या पदार्पण अन् निवृत्तीनं जुळवून आणला अजब योगायोग!

MS Dhoni Retirement: अखेर महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. जुलै 2019 पासून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 9:56 PM

Open in App

अखेर महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. जुलै 2019 पासून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू होती. पण, धोनी किमान 2020 चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळेल आणि मानानं निवृत्ती घेईल, असा सर्वांचा अंदाज होता. पण, त्या चर्चाच राहिल्या. शनिवारी धोनीनं अचानक निवृत्ती जाहीर करून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्काच दिला. भारताला अनेक अविश्वसनीय विजय मिळवून देणाऱ्या धोनीनं मैदानाबाहेर घेतलेली निवृत्ती अनेकांना पटलेली नाही. त्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) त्याला अप्रत्यक्षपणे निवृत्तीचे संकेत दिलेच होते. त्यामुळे धोनीनं त्यांना कळवण्याआधी आपल्या चाहत्यांना याबाबत थेट कळवणे पसंत केलं. MS Dhoni Retirement

महेंद्रसिंग धोनीनं वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाच्या नावावर नोंदवला होता अजरामर विक्रम!

लोकांनी तुझं यश पाहिलं, मी तुझ्यातला माणूस पाहिला आहे, विराट कोहलीचं भावनिक ट्विट

''माझ्या या प्रवासात तुम्ही दिलेल्या पाठिंबा आणि प्रेमाबद्दल आभार... 7.29 मिनिटांपासून मला तुम्ही क्रिकेटमधून निवृत्त झालो असं समजा,''धोनीचं ही पोस्ट बरीच बोलकी आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) तीनही स्पर्धा जिंकणारा तो जगातला एकमेव कर्णधार आहे. याशिवाय त्याच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. 50+च्या सरासरीनं वन डे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा खेळाडू, वन डेत सर्वाधिक नाबाद राहणारा खेळाडू, यष्टिरक्षक म्हणून वन डेत सर्वोत्तम वैयक्तिक खेळी, वन डेत सर्वाधिक यष्टिचीत, ट्वेंटी-20 तर शुन्यावर बाद न होता सर्वाधिक काळ खेळणारा फलंदाज, कर्णधार म्हणून सर्वाधिक वन डे सामने खेळणारा, आदी अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत.  MS Dhoni Retirement

महेंद्र सिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती 

MS Dhoni Retirement: मै पल दो पल का शायर हूँ...! निवृत्ती जाहीर करताना MS Dhoniनं दिला 'खास' संदेश!

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल' धोनीनं अखेर 'टफ' कॉल घेतला; संघाचं हित समजून निवृत्ती स्वीकारली

MS Dhoni Retirement: अशी कामगिरी करणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार

 महेंद्रसिंग धोनीचे 'हे' दहा विक्रम मोडणे अशक्य!

पहिल्या सामन्यात अन् अखेरच्या सामन्यातही रन आऊट10 जुलै 2019ला धोनीने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना इंग्लंडमधील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात धोनीने आपले अर्धशतकही पूर्ण केले होते. धोनी भारताला हा सामना जिंकवून देईल, असे वाटत होते. पण धोनी चोरटी धाव घ्यायला गेला आणि रनआऊट झाला होता. पण धोनी आपल्या अखेरच्याच सामन्यात रन आऊट झाला  तर कारकिर्दीतील पहिल्या सामन्यातही धोनी रन आऊट झाला होता.

धोनीने आपला पहिला सामना 23 डिसेंबर 2004 या दिवशी खेळला होता. पण या सामन्यात धोनी पहिल्याच चेंडूवर रन आऊट झाला होता. धोनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या पहिल्या आणि अखेरच्या सामन्यातही रन आऊटच झाल्याचे पाहायला मिळाले. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीविराट कोहली