Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुसाट कार चालवल्याने MS Dhoni ला बसला दंडाचा दणका, RTO ने किती रुपयांचं फाडलं 'चलन'?

MS Dhoni fined for overspeeding: सर्वसामान्यांनी नियम मोडले की RTO मोठा दंड वसूल करतात. जेव्हा सेलिब्रिटी नियम मोडतात तेव्हा काय घडतं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 20:40 IST

Open in App

MS Dhoni fined for overspeeding: टीम इंडियाचा यशस्वी माजी कर्णधार एमएस धोनी सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण यावेळी कारण ठरले आहे ते म्हणजे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन. रांची शहरातील स्वयंचलित ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टमने (Automated Traffic Monitoring System) धोनीच्या कारला वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने धावताना कॅमेऱ्यात कैद केले आणि त्यासाठी त्याला दंड भरावा लागला. वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, कायदा सर्वांसाठी समान आहे आणि तांत्रिक यंत्रणेने टिपलेल्या नोंदीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

किती रुपयांचा दंड?

धोनी आपल्या कारने रांचीमधील रिंग रोड (Ring Road) परिसरातून जात असताना, तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी त्याच्या वाहनाचा वेग विहित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे नोंदवले. या नियमाच्या उल्लंघनानंतर, मोटार वाहन कायद्याच्या कलम १८३ अंतर्गत धोनीच्या नावावर १,००० रुपयांचे ई-चलन जारी करण्यात आले. ही दंडाची कारवाई होण्यापूर्वीच, झारखंड राज्य गृहनिर्माण मंडळाने धोनीला त्याच्या एका जुन्या निवासी भूखंडाच्या (Harmu Road) व्यावसायिक वापराबाबत नोटीस पाठवली होती. त्यामुळे एकाच आठवड्यात धोनीला दोन कायदेशीर बाबींना सामोरे जावे लागले.

धोनीला दुसऱ्या प्रकरणात कायदेशीर नोटीस

रांचीच्या हरमू भागात धोनीच्या निवासस्थानासाठी देण्यात आलेल्या जमिनीच्या कथित व्यावसायिक वापराबद्दल ही नोटीस बजावण्यात आली आहे. झारखंड राज्य गृहनिर्माण मंडळाचे म्हणणे आहे की हा भूखंड केवळ निवासी उद्देशांसाठी देण्यात आला होता, परंतु नियमांचे उल्लंघन करून तेथे व्यावसायिक उपक्रम राबविले जात आहेत. नोटीसमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की धोनीने १५ दिवसांच्या आत आपली बाजू मांडावी. जर समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर बोर्ड प्लॉट H-(10)A चे वाटप रद्द करण्याची शिफारस करू शकते.

IPL २०२६ची जोरदार तयारी

मैदानाबाहेर या घडामोडी घडत असल्या तरी, धोनी सध्या आयपीएल २०२६ च्या तयारीमध्ये व्यस्त आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) सराव शिबिरात सहभाग घेतला असून तो नेटमध्ये जोरदार सराव करत आहे. ४४ व्या वर्षीही धोनी पुन्हा एकदा 'फिनिशर'च्या भूमिकेत दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : MS Dhoni Fined for Overspeeding; Faces Notice Over Land Use

Web Summary : MS Dhoni was fined ₹1,000 for speeding in Ranchi. He also received a notice regarding commercial use of residential land. Despite this, he's preparing for IPL 2026 with CSK.
टॅग्स :महेंद्रसिंग धोनीऑफ द फिल्डवाहतूक कोंडीवाहतूक पोलीसझारखंड