Join us

MS Dhoni: धोनीचा 'शेतकरी स्वॅग'! ट्रॅक्टरचं स्टेअरिंग हातात घेऊन केली नांगरणी, VIDEO 

ms dhoni viral video: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा शेतकरी लूक व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 19:59 IST

Open in App

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी ट्वेंटी-20 लीग अर्थात आयपीएल (IPL) आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज महेंद्रसिंग धोनीसाठी आगामी आयपीएल हंगाम शेवटचा असू शकतो. धोनी 2023च्या हंगामानंतर निवृत्ती घेणार असल्याची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. अशातच काही दिवसांपूर्वी धोनी आगामी आयपीएलसाठी फलंदाजीचा सराव करताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. आता कॅप्टन कूल एका नव्या अवतारात समोर आला आहे. सोशल मीडियावर फार सक्रिय नसणाऱ्या धोनीने एक व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

दरम्यान, धोनीने शेतात ट्रॅक्टर चालवून नांगरणी करण्याचा आनंद घेतला. धोनीने इस्टाग्राम व्हिडीओ शेअर केला असून कॅप्शनमध्ये म्हटले की, "काहीतरी नवीन शिकून आनंद झाला पण काम पूर्ण व्हायला खूप वेळ लागला." 

2023च्या हंगामासाठी CSKचा संघ -महेंद्रसिंग धोनी, बेन स्टोक्स, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, दीपक चहर, अजिंक्य रहाणे, थिक्साना महिषा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, ड्वेन प्रेटोरियस, मुकेश चौधरी, समिरजीत सिंग, मथिशा पथिराना, तुषार देशपांडे, मिचेल सँटनर, राजवर्धन हंगर्गेकर, प्रशांत सोलंकी, सुभ्रांषू सेनापती, शैक राशीद, निशांत सिंधू, कायले जेमिन्सन, अजय मंडल, भगत वर्मा. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीसोशल व्हायरलचेन्नई सुपर किंग्सशेतकरीभारतीय क्रिकेट संघ
Open in App