Most Wickets For Men's T20 Asia Cup Record : आशिया कप स्पर्धेतील यंदाच्या हंगामातील सामने हे टी-२० प्रकारात खेळवण्यात येणार आहेत. युएईतील दुबई आणि अबू धाबीच्या मैदानात खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघ प्रबळ दावेदार मानाला जातोय. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपासून सातत्याने टीम इंडियाने छोटया फॉरमॅटमध्ये मोठा धमाका करून दाखवलाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी, पण...
यावेळी हार्दिक पांड्याला मोठा विक्रम प्रस्थापित करण्याची संधी आहे. सध्याच्या घडीला टी-२० आशिया कप स्पर्धेतील नंबर वन गोलंदाज टीम इंडियातून बाहेर आहे. भारताकडूनच नव्हे तर टी-२० आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भुवनेश्वर कुमार अव्वलस्थानी आहे. त्याला मागे टाकून पांड्याला नंबर वन होण्याची संधी आहे. हा विक्रम हार्दिक पांड्यासाठी सहज शक्य वाटत असला तरी एक गडी त्याच्या आडवा येऊ शकतो.
Danish Malewar Double Century : विदर्भकराची कमाल; पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकासह रचला इतिहास
भुवनेश्वर कुमार नंबर वन आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात तिसऱ्यांदा ही स्पर्धा टी-२० प्रकारात खेळवण्यात येत आहे. आतापर्यत दोन वेळा झालेल्या हंगामत भारतीय संघाचे प्रतिनीधीत्व करताना भुवनेश्वर कुमारनं सर्वाधिक विकेट्सचा डाव साधला आहे. भुवीच्या खात्यात १३ विकेट्स जमा आहेत. पण तो आता संघाचा भाग नाही. त्यामुळे हार्दिक पांड्याला त्याला ओव्हरटेक करण्याची संधी आहे. पण त्याच्यासोबत राशीदही या विक्रमावर डोळा ठेवून असेल.
हार्दिक पांड्या अन् राशीद खान यांच्यात तगडी फाईट
यंदाच्या हंगामात भुवनेश्वर कुमारचा आशिया कप स्पर्धेतील रेकॉर्ड मोडीत निघणार हे जवळपास निश्चित आहे. पण हार्दिक पांड्या नंबर वनचा डाव साधणार की, राशीद खान भारी ठरणार हे पाहण्याजोगे असेल. आतापर्यंत या दोघांनी टी-२० आशिया कप स्पर्धेत प्रत्येकी ११- ११ विकेट्स घेतल्या आहेत. भुवीचा विक्रम मोडीत काढण्यासाठी दोघांनीही प्रत्येकी ३-३ विकेट्स मिळवायच्या आहेत. या पुढे जाऊन जो दोघांत सर्वाधिक विकेट् घेईल तो टी-२० आशिया कप स्पर्धेत नंबर वन गोलंदाज ठरेल.