Join us

'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video

Temba Bavuma son victory walk video, WTC Final 2025: बवुमाने लेकाला आपली टेस्ट कॅप घातली, मग कडेवर घेऊन आनंदाने मिरवले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 14:27 IST

Open in App

Temba Bavuma son victory walk video, WTC Final 2025: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत २७ वर्षांनी पहिल्यांदाच ICC स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. २८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर एडन मार्करमचे धडाकेबाज शतक (१३६) आणि कर्णधार टेम्बा बवुमाचे झुंजार अर्धशतक (६६) यांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने कांगारुंचा ५ गडी राखून पराभव केला. या विजयासह कर्णधार बवुमाने एकही कसोटी सामना न रहण्याचा आपला विक्रम कायम राखला. पण या साऱ्या गोष्टींपेक्षाही बवुमाने आपल्या चिमुरड्या लेकाला कडेवर घेऊन केलेला 'विक्टरी वॉक' चर्चेचा विषय ठरला आणि चाहत्यांनाही भावला.

लेकासोबत टेम्बा बवुमाचं खास 'बॉन्डींग'

आफ्रिकेला विजयासाठी २८२ धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्करमने झंझावाती शतक ठोकले. पण त्यासोबतच बवुमानेही झुंजार अर्धशतक लगावले. स्नायूंची दुखापत झाली असतानाही तो देशासाठी लढला आणि उपयुक्त खेळी केली. धाव घेताना त्याचा हॅमस्ट्रिंगचा स्नायू खेचला गेला होता. त्यामुळे अवघ्या ९ धावांवर असताना तो कळवळला. त्याच्यावर फिजीओने उपचार केले. वेदनेने कण्हत आणि लंगडत तो पुन्हा उठला आणि त्याने कांगारू गोलंदाजांना भिडत अर्धशतक ठोकले. त्यामुळे टेम्बा बवुमाने हा विजय मिळवल्यानंतर त्याने खास पद्धतीने सेलिब्रेशन केले. आपल्या चिमुरड्या लेकाला कडेवर घेऊन त्याच्यासोबत त्याने विजयानंतर चाहत्यांचे अभिवादन केले आणि शुभेच्छा स्वीकारल्या. सोशल मीडियावरील चाहत्यांनाही हा व्हिडीओ खूप आवडला. पाहा व्हिडीओ-

दरम्यान, आफ्रिकेच्या संघाने लॉर्ड्सच्या मैदानातील लढाई जिंकली अन् या विजयासह टेम्बा बावुमाने ९५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व करताना टेम्बा बावुमाने १० पैकी ९ कसोटी सामन्यात संघाला विजय मिळवून दिला. यातील एक सामना अनिर्णित राहिला आहे. यासह त्याने इंग्लंडचा माजी कर्णधार पर्सी चॅपमन (Percy Chapman) या दिग्गजाचा विक्रम मोडीत काढला. १९२६ ते १९३० या कालावधीत इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व करताना पर्सी चॅपमन या दिग्गजाने १० कसोटीतील ९ सामने जिंकले होते.

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाद. आफ्रिकाआॅस्ट्रेलियाव्हायरल फोटोज्व्हायरल व्हिडिओ