Join us

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी हसीनचे काँग्रेस पक्षामध्ये स्वागत केले. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 20:59 IST

Open in App
ठळक मुद्देहसीन जहाँने आपला पती शामीचे बऱ्याच स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता.

मुंबई : क्रिकेटपटू मोहम्मद शमीवर गंभीर आरोप करणारी पत्नी हसीन जहाँने काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी हसीनचे काँग्रेस पक्षामध्ये स्वागत केले. 

हसीन जहाँने आपला पती शामीचे बऱ्याच स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर पाकिस्तानमध्येही त्याची एक प्रेयसी आहे. तिच्याबरोबर त्याने दुबईमध्ये काही काळ व्यतित केला आहे, असा आरोपही हसीनने केला होता. त्यानंतर हसीनने शामीवर मॅच फिक्सींग आणि देशाची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर कोलकाता पोलिसांनी शामीची चौकशी केली होती.

टॅग्स :काँग्रेससंजय निरुपममोहम्मद शामी