Mohammed Shami On Asia Cup Snub : भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी याने आशिया कप स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात स्थान न मिळाल्याबद्दल मनातील खंत बोलून दाखवलीये. आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात जसप्रीत बुमराहसह पाच गोलंदाजांचा समावेश आहे. पण मोहम्मद शमीला मात्र मुख्य संघातच नव्हे तर राखीव ५ खेळाडूंच्या यादीतही स्थान मिळालेले नाही. फिटनेसमुळे त्याच्या नावाचा विचार झालेला नाही, अशी चर्चाही क्रिकेट वर्तुळात रंगताना पाहायला मिळाली. यावर आता शमीनं पहिल्यांदाच भाष्य केले आहे. जर मी दुलिप करंडक स्पर्धेसाठी फिट असेल तर आशिया कप स्पर्धेसाठी अनफिट का वाटतो? असा प्रश्न त्याने अप्रत्यक्षरित्या बीसीसीआय निवडकर्त्यांना विचारला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियात नाही मिळाली संधी; शमी म्हणाला...
फिटनेसमुळेच मोहम्मद शमीला संघाबाहेर ठेवलं असावं अस बोलले जात असताना मोहम्मद शमीनं आशिया कप स्पर्धेत संघात स्थान न मिळालेल्या मुद्यावर भाष्य केले आहे. दुलिप करंडक स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे सांगत तो म्हणाला की, "निवड न झाल्याबद्दल मी कुणाला दोषी ठरवणार नाही. जर संघासाठी मी योग्य वाटत असेल तर निवड करा अन्यथा राहू देत. टीम इंडियासाठी योग्य निर्णय घेणं ही निवडकर्त्यांची जबाबदारी आहे. मला माझ्या क्षमतेवर भरवसा आहे. ज्यावेळी मला संधी मिळेल त्यावेळी मी सर्वोत्तम देईन. मी यासाठी मेहनत घेत आहे."
Rinku Singh Fifty : आशिया कप आधी रिंकूचा पुन्हा धमाका; गोलंदाजांची २०० प्लस स्ट्राइक रेटसह धुलाई
अप्रत्यक्ष BCCI निवडकर्त्यांवर साधला निशाणा
देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित दुलिप करंडक स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे सांगत त्याने फिटनेसचा प्रश्न खोडून काढलाय. स्वत:मधील क्षमता सिद्द करण्यासाठी मेहनत घेतोय, हे सांगत त्याने BCCI निवडकर्त्यांना त्याच्या फिटनेसवर अन् त्याच्या क्षमतेवर भरवसा नाही, असेच त्याला म्हणायचे आहे, असेही वाटते.
लेट एन्ट्री, घोट्याच्या वेदना कमी करण्यासाठी इंजेक्शन घेऊन खेळला, पण...
भारतीय संघातील काही खेळाडू असे आहेत जे सातत्याने संधीचं सोनं करून दाखवतात. पण मोजक्या सामन्यानंतर काही स्टार खेळाडूंना बाहेर बसवण्यात येते. मोहम्मद शमी हा त्यापैकीच एक आहे. २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत तो संघात होता. पण पहिल्या चाह सामन्यात त्याला बाकावर बसवले. हार्दिक पांड्याच्या दुखापतीनंतर त्याची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली अन् त्याने सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश केला. एवढेच नाही तर डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली असताना तो इंजेक्शन घेऊन खेळला. ही रिस्क त्याला चांगलीच महागात पडली. स्पर्धा संपली अन् दुखापतीतून सावरण्यासाठी शमी वर्षभर संघाबाहेर बसावे लागले.
आता टार्गेट एकच... घरच्या मैदानातील कसोटी मालिकेत कमबॅकची संधी मिळणार का?
इंग्लंड विरुद्धच्या घरच्या मैदानातील टी-२० मालिकेतून शमीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केले. त्यानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीही तो टीम इंडियाचा भाग राहिला. पण आता पुन्हा टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी तो वेटिंगवर आहे. दुलिप ट्रॉफी स्पर्धेत पूर्व विभाग संघाकडून तो मैदानात उतरला असून इथं दमदार कामगिरी करत वेस्ट इंडिज विरुद्धच्या घऱच्या मैदानातील कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात दावेदारी पक्की करण्यासाठी तो जोर लावताना दिसेल.