Join us

उल्हासनगरमध्ये सराईत मोबाईल चोराला अटक, ४ मोबाईल हस्तगत

उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एका मोबाईल चोरीचा समांतर तपास करीत होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 23:20 IST

Open in App

उल्हासनगर : शहर गुन्हे अन्वेषण विभागाने एका सराईत मोबाईल चोराला शुक्रवारी सापळा रचून अटक केली. त्याने ३ मोबाईल चोरीच्या गुन्हयाची कबुली दिली असून पोलिसांनी ६० हजार किमतीचे ४ मोबाईल हस्तगत केले आहे. 

उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एका मोबाईल चोरीचा समांतर तपास करीत होते. दरम्यान विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांना एका गुप्त बातमीदारा द्वारे एक सराईत मोबाईल चोर शुक्रवारी मोबाईल विक्री साठी कॅम्प नं-३ येथील १७ सेक्शन मोबाईल मार्केट मध्ये विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अन्वेषण विभागाने सापळा रचुन आकाश मनोहर जाधव याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने तीन मोबाईल चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ६० हजार किमतीचे एकून ४ मोबाईल हस्तगत केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली. सराईत मोबाईल चोर शांतीनगर कॅम्प नं-३ परिसरातील राहणारा असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :चोरपोलिसमोबाइलउल्हासनगर
Open in App