"आम्हाला घरी परतायचं आहे…" UAE मध्ये अडकलेल्या बेयरस्टोची ब्रिटनच्या पंतप्रधानांना भावनिक साद

इंग्लंडच्या क्रिकेटरची ब्रिटनच्या पंतप्रधानांकडे मदतीची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 18:33 IST2026-03-01T18:31:25+5:302026-03-01T18:33:24+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Middle East Crisis Jonny Bairstow Stuck In Abu Dhabi Seek Help From Prime Minister Keir Starmer | "आम्हाला घरी परतायचं आहे…" UAE मध्ये अडकलेल्या बेयरस्टोची ब्रिटनच्या पंतप्रधानांना भावनिक साद

"आम्हाला घरी परतायचं आहे…" UAE मध्ये अडकलेल्या बेयरस्टोची ब्रिटनच्या पंतप्रधानांना भावनिक साद

इंग्लंडचा स्टार क्रिकेटपटू जॉनी बेयरस्टो सध्या यूएईमध्ये अडकला असून मायदेशी परतण्यासाठी त्याने थेट ब्रिटनच्या पंतप्रधानांकडे मदतीची विनंती केली आहे. बेयरस्टो सध्या प्रशिक्षकाच्या रुपात इंग्लंड लायन्स संघासोबत आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर जोरदार हल्ले सुरु केले आहेत. प्रत्युत्तरादाखल इराणकडून UAE तील काही ठिकाणांवर हल्ले सुरु आहेत. परिणामी मध्य पूर्वेतील अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. इंग्लंडचा क्रिकेटर आणि संघातील खेळाडू अबू धाबीमध्ये अडकून आहेत. 

इंग्लंडच्या क्रिकेटरची ब्रिटनच्या पंतप्रधानांकडे मदतीची विनंती

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ला केल्यानंतर संपूर्ण मध्य पूर्वेतील हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक देशांनी आपले एअरस्पेस बंद केले असून, त्यामुळे विमान वाहतूकीवर मोठा परिणाम झाला आहे. काही उड्डाणे रद्द झाली आहेत.  या पार्श्वभूमीवर बेयरस्टोने ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर (Keir Starmer) यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.

“१०० मीटरवर मोठा स्फोट झाला अन्…”; पी.व्ही.सिंधूंने सांगितला दुबई विमानतळाचा थरारक घटनाक्रम

काहीच प्रतिसाद नाही मिळाला, क्रिकेटरनं एक्सवरुन व्यक्त केली नाराजी

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी इराणवरील हल्ल्याबाबत निवेदन जारी केल्यानंतर बेयरस्टोने त्यावर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, “आपण आम्हाला घरी परत आणू शकता का?” मात्र त्याला उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्याने ‘एक्स’वर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली. एमिरेट्सची फ्लाइट रद्द झाल्यानंतर कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसल्याचे त्याने सांगितले आहे.

इंग्लंड अँण्ड वेल्स बोर्डानेही प्रसिद्ध केले आहे निवेदन

 इंग्लंड लायन्स आणि पाकिस्तान शाहीन यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना रद्द करण्यात आला आहे. यूएईमध्ये होणाऱ्या इंग्लंड महिला संघाच्या सरावालाही स्थगिती देण्यात आली आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने निवेदन जारी करत सांगितले आहे की, "खेळाडू आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च जबाबदारी आहे. मध्य पूर्वेतील  घडामोडींवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि सुरक्षा तज्ज्ञांशी सातत्याने संपर्कात आहोत."

Web Title : जॉनी बेयरस्टो ने यूएई से घर वापसी के लिए मदद की गुहार लगाई।

Web Summary : मध्य पूर्व में तनाव के कारण यूएई में फंसे इंग्लैंड के क्रिकेटर जॉनी बेयरस्टो ने यूके के प्रधानमंत्री से मदद की अपील की है। ईरान पर संयुक्त अमेरिकी-इजरायल हमलों के बाद उड़ानें बाधित हुईं। इंग्लैंड और वेल्स क्रिकेट बोर्ड सुरक्षा को प्राथमिकता देता है और स्थिति पर बारीकी से नजर रख रहा है।

Web Title : Jonny Bairstow pleads for help home from UAE amid conflict.

Web Summary : England cricketer Jonny Bairstow, stranded in the UAE due to Middle East tensions, has appealed to the UK Prime Minister for help. Flight disruptions followed joint US-Israel attacks on Iran. The England and Wales Cricket Board prioritizes safety, monitoring the situation closely.