T20 World Cup 2026: इथं पर्यंत मजल मारण्याची पाकची 'औकात' नाही? टीम इंडियासह हे चार संघ सेमीफायनल खेळतील; दिग्गजाची भविष्यवाणी

T20 World Cup 2026: इंग्लंडच्या दिग्गजाची सेमीफायनलिस्टसंदर्भात भविष्यवाणी, पाक किंमत शून्यच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 16:31 IST2026-02-03T16:14:52+5:302026-02-03T16:31:24+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Michael Vaughan Prediction For T20 World Cup 2026 Semifinalist Team India England Not Pakistan In This Race | T20 World Cup 2026: इथं पर्यंत मजल मारण्याची पाकची 'औकात' नाही? टीम इंडियासह हे चार संघ सेमीफायनल खेळतील; दिग्गजाची भविष्यवाणी

T20 World Cup 2026: इथं पर्यंत मजल मारण्याची पाकची 'औकात' नाही? टीम इंडियासह हे चार संघ सेमीफायनल खेळतील; दिग्गजाची भविष्यवाणी

भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी पाकिस्तानच्या नौटंकीचा मुद्दा गाजत आहे. पाकिस्तानच्या संघाने साखळी फेरीतील भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे. ICC आणि BCCI समोर पाकिस्तान झुकणार का? सेमी फायनल आणि फायनलमध्येही त्यांची हीच भूमिका राहणार का? असे प्रश्न  उपस्थितीत होत आहेत.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

इंग्लंडच्या दिग्गजाची सेमीफायनलिस्टसंदर्भात भविष्यवाणी, पाक किंमत शून्यच 

यादरम्यान आता यंदाच्या हंगामातील स्पर्धेत सेमीफायनल पर्यंत कोण मजल मारणार? यासंदर्भातील चर्चेलाही सुरुवात झाली आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटर आणि विद्यमान समालोचक मायकेल वॉन याने ४ सेमीफायनलिस्टसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. टीम इंडियासह चार संघाची नावे सांगताना त्याने पाकिस्तानला या शर्यतीतून आउट केल्याचे दिसते. पाकिस्तानची सेमीपर्यंत धडक मारायची लायकी आहे, असे त्याला वाटत नाही, असेच त्याच्या विश्लेषणावरून दिसते.  

"मोदींनी ठरवलं तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड उद्ध्वस्त होईल"; पाकिस्तानी क्रिकेटरचा Video Viral

भारत-इंग्लंडसह या दोन संघांना सेमीफायनलिस्टच्या रुपात पसंती


  
इंग्लंडचा माजी क्रिकेटर मायकेल वॉनने आपल्या X (ट्विटर) अकाउंटवर सेमीफायनलमध्ये पोहोचणाऱ्या चार संघांबद्दल मत व्यक्त केले आहे. भारत आणि इंग्लंडसह न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा संघ सेमीफायनल खेळताना दिसेल, अशी भविष्यवाणी त्याने केली आहे. वॉन याने पाकिस्तानसह दक्षिण आफ्रिकेलाही या शर्यतीतून वगळल्याचे  दिसते. 

टीम इंडिया यंदाच्या जेतेपदाची प्रबळ दावेदार, कारण...

टीम इंडिया गत चॅम्पियन आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आतापर्यंतच्या इतिहासात कोणत्याही संघाने सलग दोन वेळा या स्पर्धेचं जेतेपद मिळवलेले नाही. एवढेच नव्हे तर घरच्या मैदानावर अद्याप कुणीच टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकलेली नाही. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ नवा इतिहास घडवेल, अशी सर्वांना अपेक्षा आहे. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपासून भारतीय संघाने छोट्या फॉरमॅटमध्ये सातत्यपूर्ण दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेतील जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. वॉनने वर्तवलेल्या अंदाजानुसार इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंडचा संघ टीम इंडियाला तगडी फाइट देणार का ते पाहण्याजोगे असेल.
 

Web Title : T20 विश्व कप: क्या पाकिस्तान बाहर? विशेषज्ञ ने सेमीफाइनल की भविष्यवाणी की।

Web Summary : इंग्लैंड के माइकल वॉन ने भविष्यवाणी की है कि भारत, इंग्लैंड, न्यूजीलैंड और ऑस्ट्रेलिया टी20 विश्व कप के सेमीफाइनल में पहुंचेंगे। उन्होंने पाकिस्तान और दक्षिण अफ्रीका को बाहर कर दिया, भारत को उसके लगातार प्रदर्शन के कारण मजबूत दावेदार बताया।

Web Title : T20 World Cup: Is Pakistan out? Expert predicts semi-finalists.

Web Summary : England's Michael Vaughan predicts India, England, New Zealand, and Australia will reach the T20 World Cup semi-finals. He excludes Pakistan and South Africa, citing India as strong contenders due to their consistent performance.